विरोधी पक्षाची गोवा फॉर्वर्डशी युती?

दिगंबर कामत यांनी पालिका निवडणूक एकत्र लढवण्याची शक्यता नाकारू शकत नाही, असं विधान केलंय.

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः मडगाव पालिका निवडणुकीत मागच्यावेळी प्रमाणे यंदाही विजय सरदेसाई आणि दिगंबर कामत एकत्र येण्याची चिन्हं दिसत आहेत. आणि याला कारण म्हणजे विरोध पक्षनेते दिगंबर कामत यांनी त्या दिशेने दिलेले संकेत. शुक्रवारी दिगंबर कामत यांनी आपल्या नगरसेवकांबरोबर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालिका निवडणूक एकत्र लढवण्याची शक्यता नाकारू शकत नाही, असं विधान पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना केलंय.

चांगली कामगिरी करणार्‍यांना पुन्हा संधी

मागच्या पाच वर्षात आमच्या ज्या नगरसेवकांनी चांगलं काम केलंय त्यांना नक्कीच पुन्हा उमेदवारी दिली जाईल, असं कामत म्हणालेत. पुत्र योगीराज कामत यांना पालिका निवडणूकीत उतरवणार का? या प्रश्नावर उत्तर देताना कामत म्हणाले की, जर प्रभागातून त्याला पाठिंबा मिळत असेल तर निर्णय घेता येईल.

मडगावात विकास कामांना चालना

मागच्या पाच वर्षात मडगावात कित्येक कामांना चालना देण्यात आलीये. यात आपत्कालीन रस्ते परिस्थितीत, आवश्यक असलेले शेल्टर होम, रस्ता हॉट मिक्सिंग, नाला दुरुस्ती ही कामं येत्या काही काळात पूर्ण होणारेय. मडगावमधील सर्व प्रभागांत कामं सुरूअसून, ती येत्या काही दिवसांनी पूर्णत्वास येणारेत. यात मडगावमधील काही रस्ते यांची हॉट मिक्सिंग करण्यात येणारेत. याबरोबरच मडगाव केपेला जोडणार्‍या रस्त्याचे रुंदीकरण, आपत्कालीन परिस्थितीत गरजेची नालासफाई अशी अनेक कामं हाती असलेले शेल्टर होम याची उभारणी बाल भवनजवळ करण्यात येतेय. नाला सफाई अशी अनेक कामं हाती घेण्यात आली असल्याचं त्यांनी या वेळी सांगितलंय.

कामत यांच्या भूमिकेचं स्वागत – सरदेसाई

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या भूमिकेचं आपण स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केलीये. आम्ही स्वबळावर निवडणूक लढविण्यास तयार आहोत. मात्र मतविभागणीचा फायदा भाजपला मिळू नये यासाठी तडजोड करण्याची आपली तयारी आहे., सध्या शेळ मेळावली येथे ज्या तर्‍हेने आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयल होतोय ते पहिल्यास या कृतीविरुद्ध संयुक्तपणे विरोधकांनी आवाज उठविण्याची गरज आहे . विरोधी पक्षनेते या नात्याने सर्व विरोधकांचा संयुक्त मोर्चा मेळावली येथे नेण्यासाठी कामत यांनी पुढाकार घ्यावा, त्यांना पाठिंबा देण्याची आपली तयारी असल्याचं ते म्हणालेत. गिरीश चोडणकर यांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता, ज्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यांच्या वक्तव्यावर आणि काय बोलावं, असं ते म्हणालेत, मात्र तत्वांची राखण करून प्रत्येक निवडणूक हरणार्‍यांपैकी आपण नसून आम्ही निवडणूक जिंकण्यासाठी आणि लोकांना न्याय देण्यासाठी राजकारणात आहोत , असंही त्यांनी ठणकावून सांगितलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!