नौदलाला ध्वजारोहणासाठी विरोध करणं राष्ट्रविरोधी! मुख्यमंत्र्यांची सेंट जासिंतोंवरील स्थानिकांवर टीका

सेंट जासिंतो बेटावर नौदलाला विरोध केल्यावरुन नाराजी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : सेंट जासिंतो बेटावर स्वातंत्र्यदिनी ध्वज फडकावण्यास नौदलाला स्थानिकांनी विरोध दर्शवल्यानं वातावरण चांगलंच पेटलंय. बेट ही आमच्या पूर्वजांची खासगी मालमत्ता आहे आणि नौदलानं त्यावर हक्क गाजवू नये, असं स्थानिकांनी म्हटलंय. तसंच स्वातंत्र्यदिनी आम्ही ध्वजारोहण करणार असून नौदल अधिकार्‍यांनी त्यावेळी यावं, असं आवाहनदेखील स्थानिकांनी केलंय. या संदर्भात जुझे फिलिप डिसोझा यांनी अधिक माहिती दिली होती.

दरम्यान, या सगळ्यावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ही बाब दुर्दैवी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. ट्वीट करत मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यावर आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. सेंट जासिंतो बेटावरील काहींनी नौदलाला ध्वजारोहण करण्यास विरोध करणं हे दुर्दैवी आणि लज्जास्पद असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. याचा मी निषेध करतो आणि गोवा सरकार अशा गोष्टी अजिबात खपवून घेणार नाही, असा इशाराही देतो, असंही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटलंय.

हेही वाचा – गोव्यात ‘घाटी’ हा शब्द शिवी असल्यासारखा वापरला जातो, त्यानिमित्त…

त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यानी नौदलाला ध्वजारोहण करण्याबाबत सर्वतोपरी सहकार्य सरकार करेल, असं आश्वस्तही केलंय. राष्ट्रविरोधी अशा गोष्टींना जराही थारा दिला जाणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. राष्ट्र आमच्यासाठी पहिलं प्राधान्य असेल, असंही त्यांनी नमूद केलंय.

हेही वाचा – अध्यक्षांशिवाय काँग्रेस पक्ष पुढे कसा जाणार ?

नेमका काय आहे वाद?

जुझे फिलिप डिसोझा यांनी सेंट जोसिता बेटावर येऊन नौदलाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिकांवर हक्क बजावणं योग्य नसल्याचं म्हटलंय. त्यांनी हक्क बजावणं योग्य नाही. दरवर्षी आम्ही स्वातंत्रदिन ध्वजारोहण करतोच. पण जबरदस्ती करुन स्वातंत्रदिन साजरा केला जाऊ शकत नाही, असं जुझे फिलिप डिसोझा यांनी म्हटलंय. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांसोबत सहभागी होऊन ध्वजारोहणात सहभाग घ्यावा, असं जुझे फिलिप डिसोझा यांनी म्हटलंय.

हेही वाचा – मुख्यमंत्र्याचं चुकलं, पण म्हणून तुम्ही बरोबर कसे ?

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!