आता सीमा नियंत्रणासह लॉकडाऊन वाढवणं हा एकच पर्याय

सरकारने पूर्वसूचनांकडे दुर्लक्ष केलं म्हणत रोहन खंवटेंची सरकारवर टीका

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः सरकार पूर्वसूचना लक्षात घेण्यास चुकले असल्याची टीका पर्वरीचे आमदार रोहन खंवटेंनी केलीये. आताच्या परिस्थितीत केवळ सीमा नियंत्रणासह लॉकडाऊन वाढवल्यासच गोव्याला वाचवता येईल, असं मतही खंवटेंनी व्यक्त केलंय.

हेही वाचाः लिफ्ट बंद पडली अन् काळजाचा ठोकाच चुकला..!

राज्यातील कोविड आकडेवारी भीतीदायक

कोविडचा राज्यात वाढता प्रादुर्भाव, यामुळे अनेक गोंयकारांचे नाहक प्राण जातायत. पूर्ण लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणत सरकार आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने राज्यात कोविडचा फैलाव अतिशय वेगाने होतोय. त्यातच अपुरी कोविड रुग्णालये, रुग्णालयांमध्ये खाटा मिळवण्यासाठी गोंयकारांची चाललेली मारामारी, औषध लसी तसंच ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा, यामुळे राज्यात कोविड रुग्णांची मोठी गैरसोय होतेय. कोविडने राज्यात मृत्यूचं तांडव चालवलंय. दर दिवशी मृतांच्या आकड्यात होणारी वाढ ही भीतीदायक आहे.

हेही वाचाः मांद्रे मतदारसंघातील कोविड रुग्णांच्या मदतीला धावले सचिन परब

खंवटेंची सरकारवर ट्विटद्वारे टीका

ट्विट करत खंवटेंनी सरकारवर जोरदार टीका केलीये. खंवटे ट्विट करत म्हणालेत, हॉस्पिटलमधील अपुऱ्या खाटा, चाचणीचे रिपोर्ट्स मिळण्यात होणारा उशिरा, अनियोजित लसीकरण, कोविडचा वाढलेला उच्च पॉझिटिव्हीटी दर आणि या सगल्यामुळे गोंयकारांचा जाणारा बळी या सगळ्यात गोवा सरकार अपयशी ठरलंय. या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आता सीमा नियंत्रणासह लॉकडाऊन वाढवणं हा एकच पर्याय आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!