कामाच्या आधारे कार्यकर्ता ते मोठं पद ही वाटचाल केवळ भाजपातच शक्य

दाबोळी विमानतळावर नड्डाजींनी त्यांच्या गोव्यातल्या पहिल्या भेटीच्या आठवणी जागवल्या

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः दोन दिवसांचा गोवा दौरा आटोपून भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा जी संध्याकाळी दिल्लीत परतले. त्यांना निरोप देण्यासाठी दाबोळी विमानतळावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपादभाऊ नाईक, पक्षाध्यक्ष सदानंद तानावडे, विनय तेंडुलकर, बाबू कवळेकर, मॉविन गुदिन्हो, दामू नाईक, सतीश धोंड अशी सारी मंडळी आणि मी होतो. विमानात बसायला थोडा अवकाश होता. स्वाभाविकपणे गप्पा सुरू झाल्या.

हेही वाचाः ‘भारतमाता की जय’ संघातर्फे सत्तरीतील पूरग्रस्त भागात मदत कार्याला सुरुवात

नड्डाजींनी त्यांच्या गोव्यातल्या पहिल्या भेटीची आठवण काढली. १९९०-९१ चं साल असेल. त्यावेळी ते भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. वास्को येथे झालेल्या अभ्यासवर्गाला ते रेल्वेनं आले होते. एका लहान खोलीवजा हॉलमध्ये अभ्यासवर्ग झाला होता. सदानंद आणि विनयसह काही अवघे तरुण होते. त्यावेळी गोव्यातील प्रवासासाठी लोंढा येथे रेल्वे बदलायला लागायची. पणजीतील स्व. माधव धोंड यांचे माधवाश्रम, हॉटेल मांडवी या दोन्ही हॉटेलमधील माशांच्या जेवणाची त्यांनी आठवण काढली.

हेही वाचाः गणपती बाप्पावरुन आक्षेपार्ह टिप्पणी करणं महागात पडलं! म्हापसा पोलिसांची कारवाई

त्याकाळी प्रवास रेल्वेने होत होता. दिल्लीहुन दोन दिवस प्रवास करून हैदराबाद. तिथे ३/४ दिवस वास्तव्य. मग १ दिवस प्रवास करून बंगळुरु. तेथील २/४ दिवसांच्या पक्षकामानंतर केरळ. तिथे ३/४ दिवस प्रवास. मग ३ दिवस प्रवास करून परत दिल्ली. असा देशभर प्रवास असायचा. काम पक्ष संघटनेचं आणि ते वाढवण्याचं. सरकार वगैरे गोष्टी डोळ्यासमोर दिसतच नव्हत्या असा तो काळ. नंतर मग हिमाचलप्रदेश मध्ये आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेता आणि गेली २० वर्षं दिल्ली. श्रीपादभाऊ आमदार असताना त्यांची हिमाचल भेटीचीदेखील त्यांनी आठवण करून दिली. २०१३ साली गोव्यात झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या तयारीसाठी राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून ते काही दिवस गोव्यात होतं. मेरिओट हॉटेलमध्ये झालेल्या सदर बैठकीत नरेंद्र मोदीजी यांची प्रचार प्रमुख म्हणून झालेली घोषणा. नंतरचा ताळगांवमधील कार्यकर्ता मेळावा या सर्व आठवणी आल्या. मग मोदी मंत्रीमंडळात आरोग्यमंत्री म्हणून केलेले काम व आता राष्ट्रीय अध्यक्ष.

हेही वाचाः राज्यात पुन्हा अल्पवयीन मुलींवर बलात्कार, पोलीस असल्याचा बहाणा करत अत्याचार

गोवा आणि हिमाचली माणसांचं स्वभाववैशिष्ट्य सांगताना ते म्हणाले, छळ, स्पर्धा, कपट, फसवेगिरी इत्यादी दोघांच्याही स्वभावात नाही. हे त्यांचं निरीक्षण मात्र भावलं (अर्थात राजकारणात आवश्यक ते सोडलं तर). यासंदर्भात गोव्याचे सुपुत्र आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचेही अनुभव पुढे कधीतरी ऐकता येतील.

हेही वाचाः वन प्लस वन…दोन की झीरो?

एवढ्यात विमानात बसण्यासाठी जाण्याची सूचना झाली आणि नड्डाजींना निरोप देऊन आम्ही परत निघालो. कामाच्या आधारावर कार्यकर्ता ते मोठं पद ही वाटचाल केवळ भाजपातच होऊ शकते हे मात्र त्या गप्पातून जाणवत राहिलं. शुभेच्छा नड्डाजी!

अ‍ॅड. नरेंद्र सावईकर

हा व्हिडिओ पहाः Video | CONGRESS | हायकमांडना भेटून काँग्रेस नेते गोव्यात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!