१.५७ लाख जणांचा पहिला डोस बाकी

केवळ २३ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्यात ३१ जुलैपर्यंत सर्व नागरिकांना पहिला कोविड प्रतिबंधक डोस देण्याचा निर्धार आरोग्य खात्याने केला होता. त्यानुसार खात्याने ८७ टक्के लक्ष्य पूर्ण केलं असून, १३ टक्के म्हणजे १ लाख ५७ हजार लोक अद्याप पहिल्या डोसपासून दूरच आहेत. अचानक उद्भवलेल्या दुसऱ्या लाटेमुळे हे लक्ष्य गाठता आलं नाही. पण येत्या २० दिवसांत ते पूर्ण होईल, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचाः आमदार प्रसाद गांवकर यांनी घेतली राज्यपालांची भेट

३१ जुलैपर्यंत २३ टक्के म्हणजे १ लाख ५७ हजार लोकांचा पहिला डोस पूर्ण

देशात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. गोव्यातही त्याचवेळी लसीकरण सुरू करण्यात आलं होतं. त्यानंतर लसीकरणाला वेग देण्यासाठी राज्यात टीका उत्सव सुरू करण्यात आला होता. त्यामध्ये ३१ जुलैपर्यंत सर्व नागरिकांचा एक डोस पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. पण मे महिन्यात उसळलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्दिष्टाला खीळ बसली. कारण केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संसर्ग झालेल्या व्यक्तीला किमान तीन महिने लस देता येत नाही. याच कारणाने ३१ जुलैपर्यंत २३ टक्के म्हणजे १ लाख ५७ हजार लोकांचा पहिला डोस होऊ शकला नाही.

हेही वाचाः गोवा खाण महामंडळाच्या माध्यमातून 3 लाख लोकांच्या पुनरुज्जीवनासाठी स्पष्ट रोडमॅप तयार करा

आता १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण सुरू

लसीकरण मोहिमेत प्रथम फ्रंटलाईन वर्कर्सना आणि गंभीर आजार असलेल्या नागरिकांना डोस देण्यात आले होते. नंतर ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. आता १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण सुरू आहे.

हेही वाचाः आनंदाची बातमी : यावर्षी कला अकादमीच्या भजन स्पर्धा होणार !

एका दिवसाला राज्यात ८ ते १० हजार लोकांचं लसीकरण

एका दिवसाला राज्यातील सर्व आरोग्य केंद्रांवर मिळून ८ ते १० हजार लोकांचे लसीकरण होते. हा वेग पाहता १ लाख ५७ हजार लोकांना पहिला डोस देण्यासाठी आणखी २० दिवस लागतील. लसीकरण मोहिमेचे अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आतापर्यंत १० लाख ३७ हजार १२६ लोकांनी पहिला डोस घेतला आहे. एकूण लोकसंख्येशी तुलना केल्यास ही आकडेवारी ८७ टक्के होते. १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे सरकारने निश्चित केले होते. राज्याची लोकसंख्या १५ लाखांच्या आसपास आहे. सर्वेक्षणानुसार, ११ लाख ९४ हजार ३२७ नागरिक १८ वर्षांवरील आहेत. यांतील १० लाख ३७ हजार १२६ लोकांचा पहिला डोस झाला आहे. तर २ लाख ७० हजार ५०७ लोकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. म्हणजे दोन्ही डोस घेतलेल्यांची टक्केवारी २३ टक्के होते.

हेही वाचाः लग्नानंतर शिक्षणासाठी पतीला दिली सोडचिठ्ठी

लस घेतली तरी दक्षता हवी!

मूळ करोना विषाणूपेक्षा घातक आणि अधिक वेगाने प्रादुर्भाव होणाऱ्या ‘डेल्टा’चा भारतासह अमेरिका, चीनसह १३२ देशांमध्ये फैलाव झाला आहे. सर्वाधिक संसर्गजन्य असलेल्या डेल्टा विषाणूमुळे करोनाविरोधातील लढ्याचे स्वरूप बदलले आहे, असे अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल’ने स्पष्ट केले आहे. गोव्यालगतच्या राज्यांमध्ये डेल्टाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे दोन्ही डोस घेतले असले तरी सर्वांनाच दक्ष रहावे लागणार आहे.

हेही वाचाः आयुष्यभर अन् आयुष्याच्या शेवटीही ‘साथ साथ…’

दुसऱ्या लाटेमुळे लसीकरणाला विलंब

– लसीकरण मोहीम जानेवारीत सुरू झाली, पण मार्चमध्ये दुसऱ्या लाटेने डोके वर काढले. मे आणि जून महिन्यात कहर झाला. रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली होती.
– संसर्गमुक्त झाल्यानंतर लगेच लस घेता येत नाही. दुसऱ्या लाटेत किमान लाखभर बाधित झाले होते. या बाधितांचे अद्याप लसीकरण झालेले नाही.
– आता संसर्ग नियंत्रणात आहे. एप्रिल ते जून या कालावधीत ज्यांना संसर्ग झाला होता, त्यांना आता लस घेणे शक्य होईल. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढेल.
– पहिल्या टप्प्यात लसीकरणाबद्दल गैरसमज होते. लोकांमध्ये भीती होती. त्यामुळे ते स्वतःहुन पुढे येत नव्हते. आता भीती कमी झाली आहे, असे डॉ. राजेंद्र बोरकर यांनी सांगितले.
– पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घेण्याची मार्गदर्शक तत्त्वे होती. आता तो कालावधी ८५ दिवसांचा करण्यात आला आहे. म्हणून दुसऱ्या डोसाला विलंब झाला आहे.

हा व्हिडिओ पहाः Politics | Mandrem | आमदार दयानंद सोपटे यांची फटकेबाजी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!