महाग कांद्यांची चिंता सोडा! रेशनकार्डवर मिळणार तीन किलो कांदे

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा दिलासा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कांद्याचे दर गगनाला भिडलेले असताना राज्य सरकारनं गोमंतकीयांना मोठा दिलासा दिलाय. रेशनकार्डधारकांना तिन किलो कांदे सवलतीच्या दरात मिळणार आहेत.

बाजारात सध्या कांदा प्रतिकिलो 100 रुपयांच्या वर विकला जातो. गोवा सरकारच्या फलोत्पादन महामंडळातही कांदा चढ्या दरानेच विकला जातो. दिवाळी सण जवळ आलाय. या पार्श्वभूमीवर कांद्याचे दर प्रतिकिलो दीडशेपार जातील, अशी शक्यता आहे. मात्र रेशनकार्डधारकांना त्याची चिंता करण्याची गरज नाही. गोवा सरकारनं कांद्याची दरवाढ लक्षात घेउन कांदा आयात करण्याची योजना आखली आहे.

प्रतिकिलो केवळ 30 ते 32 रुपये

या संदर्भात दहा दिवसांत अंमलबजावणी होणार असून नागरिकांना रेशनकार्ड दाखवून कांदे सवलतीच्या दरात विकत घेता येतील. बाजारात 100 रुपयांहून अधिक दर असताना सरकार 30 ते 32 रुपयांत कांदा उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे महागाईत पोळलेल्या लोकांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार आहे.

पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!