हणजुणे इथं एक किलो गांजासह एकाला अटक

पीएसआय सुजय कोगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हणजुणे पोलिसांची कारवाई

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा : एनसीबीनं मुंबईत अंमलीपदार्थविरोधी जोरदार मोहिम उघडली असतानाच गोव्यातही या व्यवसायात असणा-या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. हणजुणे पोलिसांनी नुकतीच याबाबत लक्षवेधी कामगिरी केलीय. त्यांनी तब्बल एक किलो गांजा जप्त करत एका आरोपीला ताब्यात घेतलंय. हा आरोपी मुळचा मध्यप्रदेशातला आहे. मात्र सध्या त्याचं वास्तव्य हणजुणे इथं होतं.

हणजुणे पोलिसांनी काल रात्री साडे आठ ते साडे दहाच्या दरम्यान ही कारवाई केली. या प्रकरणी आरोपी मारेड्डी भारतकुमार रेड्डी याला एक किलो गांजासह रंगेहात पकडलंय. या गांज्याची किमत सुमारे एक लाख रूपये इतकी आहे. दरम्यान, याप्रकरणी आणखी काही धागेदोरे मिळतात का, याचा तपास पोलिस करताहेत.

पीएसआय सुजय कोगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकाॅन्स्टेबल शामसुंदर पार्सेकर, पोलिस काॅन्स्टेबल राजेश गोकर्णकर, सर्वेश साळगावक, सिध्देश नाईक, राज परब आणि देवीया घाडी यांच्या पथकानं ही कारवाई केलीय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!