फोंडा येथे गांजा प्रकरणी युवकास अटक

सुमारे ४८ हजार रुपये किमतीचा ४८८ ग्राम गांजा जप्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडा: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय. तशी उदाहरणं समोर येत आहेत. सोमवारी फोंडा तालुक्यातून असंच एक उदाहरण समोर आलंय.

हेही वाचाः निवडणूक येता दारी, पिशव्या येती घरी!

फोंडा पोलिसांनी सोमवारी दुपारी सुनील कुमार दोरा (३१, रा. सिंगीपुर – ओडिशा) या युवकाला अटक करून त्याच्याकडून सुमारे ४८ हजार रुपये किमतीचा ४८८ ग्राम गांजा जप्त केला.

नवीन कदंब बसस्थानकावर करण्यात आली. संशयित सुनील कुमार दोरा याच्याकडे ४८८ ग्राम गांजा आढळून आला.

संशयिताला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गावकर पुढील तपास करत आहेत.  

हा व्हिडिओ पहाः Important | #Breaking | #Goaमध्ये कर्फ्यूचे निर्बंध पुन्हा 7 दिवसांनी वाढवले

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!