आयआयटी आंदोलनाच्या ‘त्या’ घटनेला एक महिना पूर्ण

महिला आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाली होती

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यातील सत्तरी तालुक्यातील मेळावलीमधील आयआयटीविरोधी आंदोलनानं बरोबर महिन्याभरापूर्वी म्हणजेच ६ जानेवारीला उग्र रुप धारण केलं होतं. महत्त्वाचं म्हणजे यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये चांगलीच जुंपली होती. मोठ्या संख्येनं पोलिस मेळावलीमध्ये दाखल झाले होते. आरेखनाच्या कामात अडथळा आणत असल्याचा ठपका ठेवत मेळावलीतील आंदोलकांना रोखण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. हे आव्हान पेलत असताना पोलिसांनी योग्यप्रकारे आपली भूमिका वढवली का, हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

आंदोलकांच्या पोटावर पाय

सुरुवातीपासून मेळावलीतील महिला मोठ्या संख्येनं आयआयटीविरोधातील आंदोलनात दिसून आल्या होत्या. या महिला आंदोलकांना रोखण्याच्या प्रयत्नता असलेल्या एका पोलिसानं तर चक्क महिलेच्या अंगावरच पाय देत पुढे चाल केल्याचं दृश्यातून भासत होतं. यानंतर संपूर्ण मेळावलीतील आंदोलक आणि पोलिसांमध्ये जुंपली होती. पोलिसानं केलेला हा प्रकार आंदोलकांची दडपशाही असल्याचा आरोप करण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण घटनेची दृश्य गोवनवार्ता लाईव्हच्या कॅमेऱ्यात कैद झाली.

या धक्कादायक घटनेनंतर महिला आंदोलकांनी वाळपई पोलिस स्थानकाकडे धाव घेतली. तिथे त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. पीआय सागर एकोस्करांच्या निलंबनाची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. इतकंच काय, तर मुख्यमंत्र्यांनी वाळपईमध्ये येऊन आमच्याशी चर्चा करावी, या मागणीवर आंदोलक ठाम होते.

पाहा व्हिडीओ –

राणेंचा क्लायमॅक्स

यानंतर आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनीही फेसबूक व्हिडीओ जारी करत आयआयटी नकोच अशी भूमिका घेतली. त्यावरुनही वादंग झाला. ग्रामस्थांनी विश्वजीत राणेंवर सडकून टीका केली. आणि त्यानंतर सकाळ सकाळी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत आयआयटी मेळावलीत न करत दुसरीकडे नेऊ याची घोषणा केली. अनेक महिने आयआयटी मेळावलीतच करण्यावर ठाम असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी अखेर नमतं घेतलं.

बातमी आणि Video | मेळावलीचं सगळंकाही एका क्लिकवर!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.