डिचोलीत घर फोडून एक लाखांची चोरी

Goan Varta Live | प्रतिनिधी
डिचोली: राज्यात चोरांचा सुळसुळाट झाला आहे. त्याचप्रमाणे गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्येही वाढ झालेली पहायला मिळतेय. डिचोली येथे असाच एक चोरीचा प्रकार घडलाय. त्यामुळे या भागात खळबळ उडालीये.
हेही वाचाः असंवेदनशीलतेचा कळस! उगेत ३ म्हशींची हत्या; 1 जखमी
कुठे झाली चोरी?
डिचोली येथील शारदा नगर परिसरातील एका घराचं कुलूप तोडून चोरांनी एक लाख रुपयांच्या किमती वस्तू लंपास केल्या आहेत. हा चोरीचा प्रकार मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास घडला. घरातील मंडळी कुलूप लावून इतर ठिकाणी गेली असता पहाटे दोन अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडलं आणि घरातील कपाट तसंच इतर ठिकाणी असेलेल्या वस्तू, सोन्याचं मंगळसूत्र, सोन्याची दोन नाणी लंपास केली.
पोलिस तपास सुरू
या संदर्भात डिचोली पोलिसांना कल्पना देताच ते घटनास्थळी दाखल झाले. तसंच श्वान पथकांना पाचारण करण्यात आलं. सीसी फुटेजमध्ये दोन चोरटे असल्याचं दिसून आले आहेत. या प्रकरणी नीलकंठ मराठे यांनी तक्रार नोंदवली असून पौलीस तपास सुरू आहे.
हेही वाचाः होंडा भागातील लोकांसाठी पेपर मिल कारखाना ठरत आहे डोकेदुखी!
दरम्यान डिचोलीत आणि साखळीतही घर फोडीचा प्रकार घडल्यानं रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.