Bear attack : वाळपई येथे अस्वलाच्या हल्ल्यात एक जखमी…

गोवा कर्नाटक सीमेवर कृष्णपूर भागातील घटना

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपई : गोवा कर्नाटक सीमेवर अस्वलाच्या हल्ल्यात शंकर गावकर गंभीर जखमी झाले. त्यांच्या पायाला जबर दुखापत झाली असून त्यांना वाळपई येथे प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचाः’या’ युवा अभिनेत्याकडे तब्बल ७५ कोटी रुपयांची संपत्ती…

पायाला चावा घेतल्याने रक्तस्त्राव

दरम्यान, गोवा कर्नाटक सीमेवरील कडवळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून अस्वलाचा वावर वाढला आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गोवा कर्नाटकमधील कृष्णपूर भागातील कडवळ येथे शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अस्वलाने हल्ला केल्याची माहिती आहे. शंकर गावकर हे जंगलात गेले होते. त्यावर अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. पायाला चावा घेतल्याने रक्तस्त्राव झालेल्या अवस्थेत ते होते. आरडाओरडा केल्याने अस्वल पळून गेले. 
हेही वाचाःमडगावात इमारतीच्या स्लॅबचा भाग कोसळला; युवती जखमी…

कृष्णपूर पर्यटकांना आकर्षित करतंय

कृष्णापूर परिसरातील नागरिकांना खानापूर येथील बाजारपेठेत जाण्यासाठी अधिक अंतर कापावे लागते. मात्र, खानापूर परिसर लांब असल्याने या भागातील नागरिक आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी वाळपई शहरात मोठ्या प्रमाणात येतात. गेल्या काही वर्षांपासून कृष्णपूर पर्यटकांना आकर्षित करत आहे. दर शनिवारी या भागात गोव्यातील नागरिक मोठ्या संख्येने जातात. समृद्धीने भरलेला हा परिसर वनप्रेमींना अधिक आकर्षक वाटतो. अनेक वेळा मित्र या ठिकाणी जाऊन रात्री राहतात. मात्र, अस्वलाच्या वावरात वाढ होत असल्याने आगामी काळात धोकादायक बनण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचाःGoa Accident News: वाळपईत भरधाव कारची दुचाकीला धडक; दुचाकीचालकाचा हातच निखळला…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!