उतोर्डा येथे समुद्रात बुडून एकाचा मृत्यू

23 वर्षीय तरुण बुडाला; गडहिंग्लजच्या हलकर्णी येथील रहिवासी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यात अपघातांचं सत्र सुरू असताना समुद्रात बुडून मृत पावणाऱ्यांची संख्या वाढतेय. समुद्रात बुडून मृत्यू होणाऱ्यांमध्ये बाहेरच्या राज्यातील व्यक्तींचा जास्त प्रमाणात समावेश आहे. रविवारी उतोर्डा येथे अशीच एक घटना घडलीये. उतोर्डा समुद्रात बुडून एकाचा मृत्यू झालाय.

हेही वाचाः UPDATE | नुवे-सासष्टी येथील अपघातात 14 जणांवर गुन्हा दाखल

नक्की काय झालं?

रविवारी संध्याकाळी महाराष्ट्रातील गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी गावच्या तरुणाचा उतोर्डा समुद्रात बुडून मृत्यू झाला. अनवश शौकत ताशिलदार (वय, 23) असं मृत तरुणाचं नाव आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने तो आणि त्याचे दोन मित्र संध्याकाळी साडेपाच वाजता उतोर्डा समुद्रावर फिरण्यासाठी गेले होते. समुद्राच्या पाण्याच्या खोलीचा आणि लाटांचा अंदाज न आल्यान ते तिघेही पाण्यात बुडाले. त्यावेळी पोलिसांना एकाला बाहेर काढण्यात यश आलं. मात्र अनवश सापडला नाही.

हेही वाचाः लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

मंगळवारी सकाळी सापडला मृतदेह

गोवा पोलिसांनी अनवशला शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू ठेवली. मात्र त्यांना यश आलं नाही. सोमवारी रात्री ८ वाजता मुस्तकीम शोख (गोवा) याचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकला यश आलं. अजून शोध घेता मंगळवारी सकाळी ११ वाजता अनवेशचा मृतदेह सापडला.

हेही वाचाः एक-दो नव्हे, तब्बल 91 देशांची राष्ट्रगीते गाऊ शकतो हा गुजराती युवक

२०१८ पासून नोकरीनिमित्त तो गोव्यात

अनवश हा वेर्णा इंडस्ट्रीत गेल्या तीन वर्षांपासून नोकरीला होता. अनवश हा ताशिलदार कुटुंबातील एक हुशार आणि मनमिळावू मुलगा म्हणून परिचीत होता. हलकर्णी येथील उर्दु विद्यामंदिरात दहावी पर्यंतचं शिक्षण घेऊन गडहिंग्लज येथील डॉ. घाळी कॉलेजमधून बीएस्सीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. २०१८ पासून नोकरीनिमित्त तो गोव्यात होता. अनवशचा दुर्दैवी मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबियांसह हलकर्णीवर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!