कपिलेश्वरी अपघातात एकाचा मृत्यू

शनिवारची घटना; दोन स्कूटरमध्ये अपघात

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडाः राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रोज अपघाताच्या बातम्या समोर येत आहेत. अपघातात मरणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. कपिलेश्वरी फोंडा येथे असाच एक अपघात घडला आहे. या अपघातात एकाला मरण आलं आहे.

हेही वाचाः गोंयकारांची मतं विक्रीसाठी नाहीत; भाजप-काँग्रेसला धडा शिकवण्याची वेळ आली आहे

कसा झाला अपघात

निरीक्षक मोहन गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वेश नाईक हा आपल्या जीए- ०५ क्यू- ३६४९ क्रमांकाच्या दुचाकीवरून फोंडयाहून दुर्भाटच्या दिशेने जात होता तर विरुद्ध दिशेने कपिलेश्वरी येथील विनायक नाईक हा आपल्या जीए- ०९- एम- ३५३१ क्रमांकाच्या दुचाकीवरून फोंडयाच्या दिशेने येत होता. कवळे पंचायतीजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक बसली. यात सर्वेश नाईक गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारार्थ बांबोळीतील जीएमसीत दाखल करण्यात आलं. शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता कवळे पंचायती जवळ हा अपघात घडला. या अपघातात नाळ्ळे केरी, फोंडा येथील सर्वेश नाईक (३०) याचं रात्री उशिरा जीएमसीत उपचारा दरम्यान निधन झाले.  

हेही वाचाः मांद्रे मतदारसंघातून सचिन परब यांच्या दावेदारीला मांद्रे गट काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा

दुसऱ्या स्कूटर चालकाला अटक

या प्रकरणी फोंडा पोलिसांनी दुसरा दुचाकी चालक विनायक नाईक ( वय- २१,  रा. कपिलेश्वरी फोंडा) याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती फोंडयाचे पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांनी दिली. अटक करण्यात आलेली व्यक्ती ही मूळ कर्नाटकातील असून वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक विभिनव शिरोडकर पुढील तपास करीत आहेत. 

हेही वाचाः बिगर गोमंतकीयांसाठी सरकारकडून खास लसीकरण मोहीम

भुईपाल सत्तरीत नदीत उडी मारल्याची घटना

दरम्यान, अन्य एका घटनेत भुईपाल सत्तरी येथील निलेश कांदोळकर (५४) यांनी आज सकाळी गांजे पुलावरून नदीत उडी घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. निलेश कांदोळकर यांची दुचाकी तसंच चप्पल पुलावर सापडली असून संध्याकाळी उशिरांपर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी तपासकाम हाती घेतले, मात्र त्यांना सायंकाळपर्यंत यश आलं नाही. पुढील तपास सुरू आहे. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!