अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी एकास अटक

21 वर्षीय तरुणाला अटक; दोन दिवसांनी सापडली मुलगी

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपईः अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याप्रकरणी वाळपई पोलीसांकडून पडोसे येथील धनराज उर्फ धना नारायण कासकर या 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे वाळपई शहरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचाः कोविडनंतर आता गोव्यात डेंग्यू, मलेरियाचा धोका; सरकार पुन्हा निद्रस्त!

दोन दिवसांपासून मुलगी होती बेपत्ता

याबाबतची माहिती अशी की, दोन दिवसापासून सत्तरी तालुक्यातील नगरगाव भागातील एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. तशी तक्रार तिच्या कुटुंबीयांकडून वाळपईच्या पोलीस स्थानकावर दाखल करण्यात आली होती. त्यानंतर वाळपई पोलिसांनी यासंदर्भात कसून चौकशी करत सदर मुलीचा शोध घेण्यास सुुरुवात केली. या मुलीला धनराज उर्फ धनु या तरुणाबरोबर पाहिल्याचं पोलिस तपासात समजलं. यासंदर्भात खटला दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिस तपास सुरू

यासंदर्भात वाळपई पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं, की या संदर्भातील तक्रारी कुटुंबियांकडून दाखल करण्यात आल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिक चौकशी सुरू असून पुढील काही दिवसांमध्ये याप्रकरणी आणखी कुणाचा हात आहे का, हे उघडकीस येणार आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | Murder Case Solved | Crime | Goa Police | रेती व्यानसायिकाच्या हत्येचा अखेर छडा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!