लॅपटॉप चोरीप्रकरणी एकास अटक

पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली कारवाई

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणे : एका मित्राचा विश्वासघात करून लॅपटॉप चोरी प्रकरणी पेडणे पोलिसांनी १६ रोजी रोहित लक्ष्मण गायके (शिवाजीनगर, शिरूर, कासार रोड, बीड, पुणे) या युवकाला कांदोळी येथे अटक केली.

पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार सैतेजा चिरंजीवी, सत्यनारायण डोमेटी व त्याचा एक मित्र रोहित मोरजी येथील एका हॉटेलात रूम पार्टनर म्हणून रहात होते. एकाच रूममध्ये असल्याने सैतेजा चिरंजीवी यांनी आपला किमती लॅपटॉप वापरायला दिला होता. आपण बाथरूममध्ये गेल्यावर मित्राने आपला लॅपटॉप पळवल्याची तक्रार त्यांनी पोलीस स्टेशनला दिली.

संशयिताने आपला मोबाईल फोन बंद केला होता. हि घटना ३ रोजी घडली होती. १६ रोजी त्यांनी आपला फोन चालू केला. पोलिसांनी लगेच एक पथक तयार केले आणि फोनचे लोकेशन कांदोळी असल्याचे कळले. एक पोलीस टीम कांदोळीला गेली.

तपासादरम्यान, आरोपी व्यक्तीचा तपशील त्याच्या मोबाईल क्रमांकासह गोळा केला आणि त्याचा मोबाईल नंबर पाळत ठेवण्यात आला. आरोपीने त्याचा मोबाईल बंद ठेवला होता आणि राहण्याची जागा बदलून फिरत होता. पोलिसांनी कांदोळी येथे एका हॉटेलात जावून संशयिताना अटक केली. चौकशी दरम्यान संशयिताने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आणि सांगितले की त्याने पणजी येथील संगणक दुकानात हा लॅपटॉप विकला आहे. त्यानुसार पोलिसांनी, त्या दुकानावर छापा टाकला आणि लॅपटॉप जप्त केला. त्याची किंमत १ लाख ३४ हजार ९९० आहे.

संशयित व्यक्ती गेल्या एक महिन्यापासून गोव्यात वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये राहत होता. त्याने गोव्यात असेच गुन्हे केले असल्यास त्याची चौकशी सुरू आहे. पोलीस निरीक्षक जीवबा दळवी, पोलीस उपनिरीक्षक विवेक हलरणकर, हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पार्सेकर, पोलीस कॉन्स्टेबल सागर खोर्जुवेनकर, विनोद पेडणेकर आणि रोहन वेलगेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!