CRIME | हणजुण येथे चोरी प्रकरणी एकास अटक

हणजुण पोलिसांची कारवाई; चोरलेला माल पोलिसांनी मिळवला परत

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसाः हणजुण येथे 31 मे रोजी फेलिसियानो डिसूझा यांच्या घरातील भाडेकरूच्या खोलत चोरी झाल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी हणजुण पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत तातडीने कारवाई केली आणि चोराला शोधून काढत त्यांच्याकडून सर्व माल परत मिळवला आहे.

हेही वाचाः CRIME | हणजुण येथे ड्रग्स प्रकरणी एकास अटक

नक्की काय झालं?

31 मे च्या संध्याकाळी 6 ते रात्री 9 च्या दरम्यान हणजुण येथील फेलिसियानो डिसूझा यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या अरेझू साबर या इराणी महिलेच्या खोलीत चोरीचा प्रकार घडला. तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार 31 मे च्या संध्याकाळी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने घराच्या मागचा दरवाजा तोडला आणि ती व्यक्ती घरात शिरली आणि चोरी करून तिथून पळ काढला.

हेही वाचाः CRIME | सांतिनेझ गोळीबार प्रकरणातील टोळीला अटक

काय चोरलं?

तक्रारदार महिलेने हणजुण पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलंय, की चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोराने तिच्या खोलीतून तिला लॅपटॉप, मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरला आहे. तिचा लॅपटॉप हा ‘मेसबूक ऍपल’चा असून ‘नोकिया’ कंपनीचा तिचा मोबाईल फोन चोरीला गेल्याचं तिनं तक्रारीत नमूद केलं. त्याचप्रमाणे तिच्याकडील 12000 रुपये रोख रक्कमही गायब असल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं.

हेही वाचाः CRIME | गांजा बाळगल्याप्रकरणी पेडणे पोलिसांकडून एकाला अटक

गुन्हा दाखल; तपास सुरू

तक्रारदार महिलेने अज्ञाच चोराविरुद्ध तक्रार दाखल केली असता पोलिसांनी त्याच्या विरुद्ध आयपीसीच्या 457, 380 कलमाखाली गुन्हा क्र. 69/2021 अंतर्गत गुन्हा नोंद केला. पोलिस स्टेशनमधील पीएसआय अक्षय पार्सेकर यांनी लगेच या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली. पोलिस तपासात संशयित यालप्पा होन्नाप्पा सत्याप्पागोई (वय 20, राहणार झोरवाडो हणजुण बार्देश गोवा) याला आसगाव येथून अटक करण्यात आली. त्याचकडे तक्रारदार महिलेचा लॅपटॉप, मोबाईल फोन तसंच 12000 रोख रक्कम परत मिळवण्यात आली. सध्या संशयित गुन्हेगार पोलिस कस्टडीत आहे.

हेही वाचाः CRIME | खंडणी मागणाऱ्या टोळीविरोधात आरोपपत्र दाखल

पोलिस पथकाची कामगिरी

या प्रकरणात पीएसआय अक्षय पार्सेकर यांच्या सोबत पोलिस कॉन्स्टेबल अजिंक्य घोगळे, राजेश गोखर्णेकर, सर्वेश साळगावकर, कृष्णा बुगडे, प्रभाकर म्हावळींकर यांनी उत्तम कामगिरी केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!