टँकरच्या बॅटऱ्या चोरीप्रकरणी एकास अटक

४५ हजार रुपयांच्या बॅटऱ्या चोरल्या

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा: पर्वरी येथे गौरी पेट्रोलपंप जवळ पार्क केलेल्या दोन टँकरच्या चार बॅटऱ्या चोरल्याप्रकरणी आर्यन चौहान (२८, रा. सुकूर – पर्वरी व मूळ पंजाब) या टँकर चालकास पोलिसांनी अटक केली आहे.

मंगळवारी १४ सप्टेंबरला घडला प्रकार

पर्वरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही चोरीची घटना मंगळवारी १४ रोजी रात्री घडली होती. फिर्यादी टँकर मालक अनिल पाटील (बस्तोडा) यांच्या हा प्रकार बुधवारी सकाळी निदर्शनास आला. संशयिताने जीए ०३ डब्लू ७६९६ आणि जीए ०३ डब्लू ३९६६ क्रमांकाच्या टँकरमधील प्रत्येकी दोन बॅटऱ्या चोरीस गेल्या होत्या. या बॅटन्यांची किंमत ४५ हजार रुपये आहे.

शुक्रवारी दुपारी संशयितास अटक

संशयित टँकर चालक आर्यन चौहान यानेच त्या चोरल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला होता. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करून संशयितास शुक्रवारी दुपारी अटक केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!