गणपती बाप्पावरुन आक्षेपार्ह टिप्पणी करणं महागात पडलं! म्हापसा पोलिसांची कारवाई

तक्रार दाखल होताच पोलिसांकडून अटक

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा : गणपती बाप्पा हे सर्व हिंदूचं श्रद्धास्थान. बाप्पाबद्दल चुकीचं बोललेलं कधीच खपवून घेतलं जात नाही. यावेळीही तसंच झालंय. हिंदूंची देवता श्री गणपती संदर्बानं सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह विधान करण्यात आलं. एक ऑडियो रेकॉर्ड करुन तो फेसबूक आणि व्हॉट्सवर फिरवण्यात आला. या ऑडिओ क्लिपमध्ये शिव्यांसोबत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह शब्दांत टिप्पी करण्यात आली होती. याप्रकावरुन पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरुन शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.

crime 800 450

हेही वाचा : संभाजी भिडे म्हणतात, कोरोनामुळे जी माणसं मरतात ती जगायच्या लायक नाहीत!

काय आहे प्रकरण?

दोघ समाजांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूनं करण्यात आलेली कमेंट एकाला चांगलीच अंगलट आली आहे. मायकल लोबो यांना उद्देशून ही कमेंट करण्यात आली आहे. ही कंमेंट करणाऱ्याचं नाव होतं विल्सन फर्नांडिस उर्फ पिटू टायगर.

मायकल लोबो यांना उद्देशून कमेंट करताना विल्सन फर्नांडिस यांची जीभ घसरली. त्यांनी आक्षेपार्ह टिप्पणी करत गणपतीची पूजा आणि मासांहार यांचा युक्तीवाद करताना आक्षेपार्ह शब्द तर वापरलेच. शिवाय शिव्या देताना हिंदूंच्याही भावना दुखावतील अशी खालच्या पातळीवरची भाषा वापरली होती. याबाबतची ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर म्हापशात राहणारे सिद्धार्थ सिताराम मांद्रेकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

हेही वाचा : छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला माफी नाही! आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

मांद्रेकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत, दोन धर्मांना सामाजिक तेढ निर्माण करण्याचा हेतू असल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या कमेंटची गंभीर दखल घेत तत्काळ तपास केला आणि विल्सन फर्नांडिसविरोधात गुन्हा नोंदवलाय. विल्सन फर्नांडिस यांच्यावर कलम १५३ अ.१.अ., २९५-अ आणि २९८ कलमांप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी विल्सन याला अटल केली असून त्याची चौकशीही केली जातेय. दरम्यान, सोशल मीडियावर मत मांडताना संविधानिक भाषेत आपलं मत प्रत्येकानं माडावं, असं आवाहनही केलं जातंय. कुणाच्या भावना दुखावण्याच्या हेतूने एखादी कमेंट केली जात असेल, तर त्यावर कारवाई कडक कारवाईही केली जाईल, असे संकेतही पोलिसांनी यातून दिले आहेत.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!