फंडपेटी फोडल्याप्रकरणी एकाला अटक

मडगावातील घटना; सीदास अलमास चॅपेलची फंडपेटी फोडली

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: राज्यात चोरांचा सुळसुळाट झाला आहे. त्याचप्रमाणे गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्येही वाढ झालेली पहायला मिळतेय. मडगाव येथे असाच एक चोरीचा प्रकार घडलाय. मात्र पोलिसांना चोरांना पकडण्यात यश आल्याने स्थानिकांकडून दिलासा व्यक्त करण्यात येतोय.

हेही वाचाः विहिरीत पडलेल्या तरुणाला जीवदान

कुठे झाली चोरी?

जुने मार्केट परिसरातील सीदास अलमास चॅपेलची फंडपेटी फोडून सुमारे दोन हजार रुपये लंपास केल्याप्रकरणी अमजद खान (३८, रा. महाराष्ट्र) याला फातोर्डा पोलिसांनी गुरुवारी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून दीड हजार रुपयांची रोकड जप्त केली.

हेही वाचाः जगाला थक्क करणारी ‘मेडल मशिन्स’

संशयित ताब्यात

फातोर्डा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मडगावच्या सीदास अलमास चॅपेलचे कायतान नोरोन्हा सकाळी चॅपेल उघडण्यासाठी आले असता, चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी फातोर्डा पोलिसात तक्रार नोंद केल्यावर पोलिसांनी त्वरित कारवाई करून अमजद खान याला ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान त्याने चोरी केल्याचे कबूल केलं.

हेही वाचाः ‘ईडी’ची फ्लिपकार्टला नोटीस ; 10,600 कोटींचा ठोठावला दंड

संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद

फातोर्डा पोलिसांनी संशयिताविरुद्ध भा.दं.सं.च्या ३८० आणि ४५४ कलमांन्वये गुन्हा नोंद केला आहे. या चॅपेलमधील ही तिसरी चोरी असून, याआधी चोरांनी या चॅपेलची फंडपेटी फोडून सुमारे अडीच हजार रुपये लंपास केले होते.

हा व्हिडिओ पहाः Video | BEEF CONTROVERSARY | मेघालयच्या मंत्र्याच्या वक्तव्याच्या गोप्रेमेंकडून निषेध

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!