म्हादईप्रश्नी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार?

मंगळवारी सुप्रीम कोर्टा महत्त्वपूर्ण सुनावणीची शक्यता

विशांत वझे | प्रतिनिधी

ब्युरो : म्हादईबाबत महत्त्वाची अपडेट हाती येते आहे. म्हादई प्रश्नासंदर्भात सर्वोच्य न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या विशेष याचिकेवर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यताय. जलविवाद लवादाने यापूर्वी गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांना म्हादई आणि उपनद्यांच्या पाण्याचे वाटप करण्याचा जो अंतिम निवाडा दिला आहे. त्या विरुद्ध तिन्ही राज्यांनी पाण्याचा वाटा कमी असल्याचा दावा करून, तो वाढवून द्यावा, यासाठी याचिका दाखल केल्या आहेत. यावर मंगळवारी सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी होण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडीओ –

सरकार पूर्ण तयारीत?

लवादाच्या निकालापूर्वीच कर्नाटकाने कळसाचे पाणी मलप्रभेच्या पात्रात वळवले आहे. त्यादृष्टीने गोवा सरकारने अवमान याचिका दाखल केली आहे. कोविडमुळे वर्षभर सुनावणी घेण्यात आली नव्हती. दरम्यान, गोवा सरकारने ही सुनावणी सर्वोच्य न्यायालयासमोर व्हावी अशी मागणी केली आहे. कर्नाटकने गोव्याच्या याचिकेवर जो आक्षेप घेतला आहे, त्याला समर्थपणे उत्तर देण्यासाठी म्हादई पात्रातील पाणी, उपनद्यांची आकडेवारी, पश्चिम किनारपट्टीवर वसलेल्या गोव्याचे हवामान बदल, वैश्विक तापमान वाढीमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला अनुसरून पुरावे सादर करणं या सुनावणीत गरजेचे आहे. त्या अनुशंगाने सरकारनं काय तयारी केली आहे, हे पाहणंही महत्त्वाचंय.

हेही वाचा : CMO | मुख्यमंत्री जलवाहतूक आणि म्हादईवर काय म्हणाले ऐका

पाहा व्हिडीओ –

सुप्रीम कोर्टात काय होणार?

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या विनंतीवरून केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने जो अहवाल राष्टीय भूजल विज्ञान संस्था रूरकी यांनी सादर केलेला आहे, त्याबाबतही न्यायालयात कर्नाटक महाराष्ट्रतर्फे भूमिका मांडली जाणार आहे. गोवा सरकारने म्हादईच्या विषयी गोपनीयता बाळगून अहवाल मांडला जावा, यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्यासंदसर्भात पंधरा दिवसापूर्वी घोषणा केली होती. त्याबाबत अजून अधिकृत निर्णय झालेला नाही. दरम्यान, आता मंगळवारी सुप्रीम कोर्टात म्हादईप्रश्नी सुनावणी होते का, हे याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!