निवडणूक येता दारी, पिशव्या येती घरी!

सोशल मीडियावर टीकेची झोड

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: विधानसभा निवडणूक पाच-सहा महिन्यांमध्ये होणार आहे. राज्यात निवडणुकीचा हंगाम सुरू झाला आहे. मतदारांना खूश करण्यासाठी गणेश चतुर्थीचे निमित्त साधून इच्छुक उमेदवारांनी साहित्याने भरलेल्या पिशव्या वाटण्यास सुरुवात केली आहे. लहानशा पिशवीत चतुर्थीसाठी म्हणून साहित्य भरून अशा पिशव्या पंच आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या मार्फत वाटण्याचं काम जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे कोविडच्या काळात गायब असलेले नेते आपला फोटो छापलेल्या पिशव्यांचे वाटप आता करत आहेत. काहींनी तर सामानापेक्षा पिशव्याच महाग खरेदी केल्या आहेत.

हेही वाचाः किस ऑफ लाईफ !

सोशल मीडियावर टीकेची झोड

नेत्यांकडून आपले फोटो असलेल्या पिशव्या वाटण्यावरून सोशल मीडियावर चर्चेचा आणि खास करून टीकेचा धुरळा उडला आहे. कोविडमध्ये गायब झालेले नेते आता चतुर्थीच्या निमित्ताने पिशव्या वाटत असल्यामुळे बहुतेकांनी या नेत्यांवर सडकून टीका केली आहे.

काही नेत्यांचे फोटो, तर काही पार्टींचं चिन्ह

काही नेत्यांनी आपला फोटो आणि पक्षाचे चिन्ह छापलं आहे. पण काही विद्यमान मंत्र्यांनी आपल्या पिशवीवरून भाजपाचं ‘कमळ’ चिन्ह गायब केलं असल्यामुळे त्यांच्या राजकीय वाटचालीविषयी चर्चाही रंगत आहे. कोविडमुळे निर्माण झालेल्या वाईट स्थितीवेळी हूल देणारे नेते आता निवडणूक जवळ आल्यामुळे घरपोच सामान देत आहेत. तांदूळ, तेल, साखर, डाळ, गुळ, मूग असं साहित्य या पिशव्यांमध्ये आहे.

हा व्हिडिओ पहाः GANGWAR | FIRING | गँगवॉरदरम्यान गोळीबार, अहवालात निष्कर्प नाही!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!