‘आझादी का अमृत महोत्सवा’निमित्त सागर नाईक मुळे साकारतोय ‘लॅण्ड आर्ट’…

पंतप्रधान मोदींनी दिलेल्या प्रोत्साहनातून मिळाली प्रेरणा - सागर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कावी कला जोपासण्यासाठी धडपडणारा चित्रकार सागर नाईक मुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात मध्ये केलेल्या उल्लेखानंतर प्रकाशझोतात आला. अंत्रुज महालातील हा हरहुन्नरी कलाकार पुन्हा चर्चेत आलाय तो लॅण्ड आर्टमुळे. सागरला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड. त्यामुळे तो चित्रकलेत विविध प्रयोग नेहमीच करत असतो.
हेही वाचा:Photo Story | सोहळा लोकशाहीचा, जागर मताधिकाराचा, पहा पंचायत निवडणूक मतदानातील ‘खास फोटो’…

आतापर्यंत 5 गोवा राज्य पुरस्कार प्राप्त केले

सागरने त्याच्या या आवडीला उदरनिर्वाहाचं साधन बनवण्यासाठी 2013 मध्ये गोवा कॉलेज ऑफ आर्टस् मधून बॅचलर ऑफ फाइन आर्ट ही पदवी मिळवली. त्यानंतर हैदराबाद इथून त्यांनं यातील उच्च शिक्षण घेतलं. आता शिक्षण पूर्ण करून तो गोव्याला आहे. दुसऱ्यांसाठी नोकरी करण्यापेक्षा तो स्वतः विविध प्रयोग करणं पसंत करतो. त्याचबरोबर मूर्ती बनवण्याचा लघुउद्योगही त्यानं सुरू केलाय. त्यानं चित्रकला आणि छायाचित्रण यांची सांगड घालून आतापर्यंत 5 गोवा राज्य पुरस्कार प्राप्त केलेत. त्यांच्या चित्रात गोव्याच्या गावातील सौंदर्य, स्वातंत्र्यसैनिकांप्रती आदरभाव, देशभक्ती यांचा समावेश असतो.
हेही वाचा:Panchayat Election | कळंगुट प्रभाग ९ मध्ये आज मतदान, कारण…

कृलाकृतीचं उद्घाटन येत्या शनिवारी होणार

सध्या ‘आझादी का अमृत महोत्सवा’निमित्त सध्या सागरने भव्य असं लॅण्ड आर्ट साकारण्यास आव्हान पेललंय. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या उद्देशाने सागरने त्याच्या आडपई गावात ही कलाकृती साकारण्यास सुरुवात केलीए. त्याच्या या कृलाकृतीचं उद्घाटन येत्या शनिवारी होणार असून त्यानंतर ती लोकांसाठी खुली करण्यात येईल.
हेही वाचा:मतदान करून परतताना दाम्पत्यावर ‘काळाचा घाला’…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!