केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 14 ऑक्टोबर रोजी गोव्यात

भाजपच्या कार्यकर्त्यांना ताळगाव येथील सभागृहात करणार मार्गदर्शन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 14 ऑक्टोबर रोजी गोव्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना ताळगाव येथील सभागृहात मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर भाजपचे गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस हे आज गोव्यात दाखल झालेत. ते भाजपचे आमदार व मंत्र्यांबरोबर स्वतंत्ररित्या ते चर्चा करणार आहेत.

अमित शहा यांचा दिवसभराचा कार्यक्रम

अमित शहा हे 14 रोजी सकाळी 9 वा. गोव्यात येतील. त्यानंतर ते धारबांदोडा येथे राष्ट्रीय फॉरेंसिक विद्यापीठाची पायाभरणी करतील. नंतर केंद्रीय गृहमंत्री दुपारी 2 वाजता कुर्टी-फोंडा येथील पशुसंवर्धन अतिथी गृहाजवळील एनएफएसयूसाठी ट्रान्झिट बिल्डिंगचे उद्घाटन करतील. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता मेरियॉट हॉटेलमध्ये ते मंत्री आणि भाजप आमदारांबरोबर बैठका घेतील. आणि 15 ऑक्टोबर रोजी सकाळी दिल्लीला रवाना होतील.

फडणवीस, सी.टी.रवी यांच्या उपस्थितीत अमित शहा यांची आमदारांसोबत बैठक

दरम्यान, या निमित्ताने भाजपचे गोवा निरीक्षक सी. टी. रवी हे देखील आज गोव्यात दाखल झाले आहेत. अमित शहा हे आमदारांबरोबर जेव्हा बैठक घेणार आहेत, त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि सी. टी. रवी हे देखील उपस्थित राहाणार आहेत. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर 22 चा आकडा पार कसा करील या संदर्भात फडणवीस हे भाजपच्या कोअर समितीकडे चर्चा करतील

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!