रावण गावात फुलले भेंडीचे मळे; दर दिवशी 700 किलो भेंडीची तोडणी

आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवाच्या दिशेने गावाची वाटचाल; कृषी खात्याकडून शेतीसाठी सहकार्य

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपईः सत्तरी तालुक्यातील केरी पंचायत क्षेत्रात असलेल्या रावण गावात यंदा भेंडीचं उत्पादन विपुल पद्धतीने झालेली आहे. गेल्या काही वर्षांपासून हा गाव भेंडीच्या उत्पादनासाठी गोव्याच्या कृषी नकाशावर आला असून यंदाही मोठ्या प्रमाणात भेंडीचं उत्पादन होऊ लागलं आहे. सध्याच्या प्राप्त माहितीनुसार दर दिवशी 700 किलो भेंडीची तोडणी होत असून सदर सर्व उत्पादन फलोत्पादन महामंडळाच्या वेगवेगळ्या भाजी विक्री आस्थापनावर जात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामुळे या भागातील भेंडी उत्पादकाचा आदर्श इतर गावातील शेतकरी उत्पादकांनी घ्यावा आणि आपल्या बागेत आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा यांच्या उद्देशाने अशा प्रकारचं पीक घेण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन या भागातील शेतकरी बांधवांनी केलं आहे. याबाबतची माहिती अशी की केरी पंचायत क्षेत्र असलेल्या अंजुणे धरण प्रकल्पाच्या जलाशयावर गेल्या काही वर्षापासून रावण गावातील शेतकरी उत्पादक आपल्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची भाजी लागवड करीत आहे.

हेही वाचाः मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ देण्याचे संकेत

विविध प्रकारच्या भाजीची लागवड

सदर गावातील शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून थोड्याप्रमाणात भाजीची लागवड करीत होते. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी भाजीचं उत्पादन विपुल प्रमाणात घेण्यावर भर दिला. यात भेंडीच्या लागवडीवर जास्त प्रकारचं लक्ष घालून गेल्या काही वर्षापासून भेंडीच्या लागवडीवर भर देण्यात आलेला आहे. या पाच वर्षापासून सत्तरी तालुक्यातील रावण गाव हा गोमंतकाच्या नकाशावर मोठ्या प्रमाणात भाजी उत्पादन करीत असल्याची नवी ओळख निर्माण होऊ लागलेली आहे. गेल्या वर्षी जवळपास दहा टनापेक्षा जास्त भेंडीची लागवड करण्यात आली होती. यंदाही चांगल्या प्रकारची भेंडीचं उत्पादन झालेलं असून सध्यातरी मोठ्या प्रमाणात भेंडीची तोडणी सुरू असल्याची माहिती उपलब्ध आहे. या भागामध्ये होणारं भेंडीचं उत्पादन हे संपूर्णपणे गोव्यातील फलोत्पादन महामंडळाच्या वेगवेगळ्या आस्थापनावर जात असून त्याला चांगल्या प्रकारची मागणी मिळत असल्याची बाब समोर आलेली आहे.

हेही वाचाः अबब! सोशल डिस्टन्सींगचा असाही फज्जा

राधिका आणि जेके लागवडीतून भरपूर पीक

दरम्यान यंदा या उत्पादकांनी राधिका आणि जेके या प्रकारच्या भेंडीची लागवड करण्यात केलेली आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पीक येत असून अशा प्रकारची भेंडीची जात या भागासाठी अत्यंत पोषक असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. सुरुवातीच्या काळात फलोत्पादन महामंडळाने या भेंडीची खरेदी करण्यासाठी काही प्रमाणात चालढकल केली. मात्र त्यानंतर वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करण्यात आल्यानंतर सदर भेंडीची जात या भागातील नागरिकांसाठी पसंतीची ठरेल अशा प्रकारची प्रयत्न करण्यात आल्यानंतर या भेंडीच्या जातीला बऱ्याच प्रमाणात मागणी असल्याचं स्पष्ट झालेलं आहे.

दरदिवशी 700 कि.लो भेंडीची तोडणी

जवळपास अडीच महिन्यापूर्वी या भागांमध्ये भेंडीची बियाणी घातली होती. सध्यातरी चांगल्या प्रमाणात भेंडीचे उत्पादन झालेलं आहे. यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार दर दिवशी 700 किलो पेक्षा जास्त भेंडीचे तोडणी होत असून एक दिवस सोडून आणि फलोत्पादन महामंडळाचं वाहन घटनास्थळी येऊन यासंदर्भाची खरेदी करीत असल्याचं एकूण भेटी उत्पादकांकडून मिळालेल्या माहितीनुसार समजतं. रावण गावातील जवळपास वीस पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक अशा प्रकारच्या भाजी उत्पादन क्षेत्रात उतरले असून त्यांचा इतरांनी आदर्श घ्यावा अशा प्रकारचं त्यांचं कार्य आहे. महत्त्वाचं म्हणजे भेंडीच्या आणि इतर प्रकारच्या भाजी लागवडीसाठी रावण गाव आता हळूहळू गोव्याच्या कृषी उत्पादनाच्या नकाशावर येऊ लागलेला आहे. या भागातील शेतकरी उत्पादनासाठी करीत असलेले कष्ट त्याच्या पार्श्वभूमीवर इतरांनी त्यांचा आदर्श घेण्यासारखं कार्य आहे. प्रत्येकाकडे पडिक जमीन असते. मात्र या जमिनीचे रूपांतर कृषी क्षेत्रातील उत्पादने विकसित करण्यासाठी केल्यास येणाऱ्या काळात गोमंतकात भाजीच्या उत्पादनात स्वयंपूर्णता निर्माण होण्यासाठी अजिबात विलंब लागणार नाही.

हेही वाचाः ‘नितळ डिचोली’ सत्यात उतरवण्याचा संकल्प

कृषी उत्पादक गोपाळ गावस म्हणाले,

या भागांमध्ये परस्परांचा आदर्श घेऊन मोठ्या प्रमाणात भेंडीचं उत्पादन होऊ लागलेलं आहे. यातून बऱ्यापैकी अर्थप्राप्ती होत असून धरणाच्या जलाशयात मिळणाऱ्या पाण्याचा वापर या भागातील जमीनधारक आपल्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाजी लागवड करण्यावर भर देत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

हेही वाचाः गुन्ह्यांचा छडा लावण्याचं प्रमाण 80.25 टक्के

कृषी खात्याकडून सहकार्य

चुडामणी हुळर्णकर यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं, या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाजी लागवडी होत आहेत. यामुळे या भागातील नागरिक आपला गाव आदर्श करण्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारचं योगदान देत आहे. यासाठी कृषी खात्याचे चांगल्या प्रकारचं सहकार्य लाभत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

हेही वाचाः सामाजिक दायीतवाची पूर्ती

शेतीतून अर्थव्यवस्थेला बळकटी

कुंदा बांदेकर, नकुल पिकुळकर, किर्तिमाला पिकुळकर, स्नेहा गावस, रजनी गावस, प्रभाकर गावस, दुलो पिकुळकर, निलेश केरकर आणि इतरांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना या भागांमध्ये दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारच्या लागवड होत आहे. त्यातून चांगल्या प्रकारे अर्थव्यवस्था मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातून मदत होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!