महाविद्यालयांचे ऑफलाईन वर्ग आजपासून

उच्च शिक्षण संचालनालयाने ऑफलाइन वर्ग सुरू करण्याची मान्यता

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्यातील बहुतांश महाविद्यालयांमधून बुधवारपासून ऑफलाइन वर्ग सुरू होत आहेत. कुठल्या वर्षाचे आणि कशा पद्धतीने वर्ग सुरू करावेत, या विषयी प्रत्येक महाविद्यालय स्वतंत्रपणे निर्णय घेणार आहे. असं असलं तरीही अधिकांश महाविद्यालये तृतीय वर्षाच्या वर्गांना प्राथमिकता देणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचाः सर्वसामान्यांना मोठा फटका! पुन्हा घरगुती गॅसच्या दरात वाढ; ‘हे’ आहेत नवे दर

उच्च शिक्षण संचालनालयाने ऑफलाइन वर्ग सुरू करण्याची मान्यता

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं वय १८ पेक्षा अधिक असतं. बर्‍याच विद्यार्थ्यांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले आहेत. काही विद्यार्थ्यांनी एक डोस घेतला आहे. यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाने ऑफलाइन वर्ग सुरू करण्याची मान्यता दिली आहे. पण, त्याच्या कार्यवाहीचा अंतिम निर्णय त्या-त्या महाविद्यालयाने स्वतंत्रपणे घ्यायचा आहे.

साखळी सरकारी महाविद्यालयात तृतीय वर्षासहीत पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू

साखळी सरकारी महाविद्यालयात तृतीय वर्षासहीत पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू होणार आहेत. या महाविद्यालयात एमए (इंग्लिश), एमए (इकोनॉमिक्स) आणि एमएससी (गणित) हे पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत. या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग आजपासून सुरू होतील, अशी माहिती प्राचार्य जेरोमिनो मेंडीस यांनी दिली.

हा व्हिडिओ पहाः Politics | BJP | माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांचं सूचक वक्तव्य

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!