या अधिकाऱ्यांना जाब विचाराच!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांच्या निर्देशांवरून पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी शनिवारी अधिकारी बाहेर पडणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निर्देशांवरून ठिकठिकाणी पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी शनिवारी अधिकारी बाहेर पडणार आहेत. पूरग्रस्त भागांची पाहणी करून तेथील नुकसानीचा आढावा तसंच लोकांच्या मदतकार्यासाठीचा आढावा घ्या, असं मुख्यमंत्र्यांनी या अधिकाऱ्यांना सांगितलंय. हे अधिकारी आता या भागांना भेट देणार आहेत. मुळात दरवर्षी पावसाळ्यात राज्यातील अनेक भागांत पूरसदृष्य परिस्थिती निर्माण होते. सरकारी अधिकारी हे कायमस्वरूपी सेवेत असतात. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या अधिकाऱ्यांनी काय केले, असा सवाल उपस्थित होणार आहे.

हेही वाचाः रोहन हरमलकरला अटकपूर्व जामीन

आयएएस अधिकाऱ्यांचा टूर

सचिवालयात केवळ मंत्र्यांसमोर हजेरी लावून फाईलमध्ये डोके घालून बसणारे आयएएस अधिकारी पूरग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. त्यांच्यासमवेत तालुक्याचे मामलेदार, उपजिल्हाधिकारी हजर असतील. वास्तविक यावेळी स्थानिकांकडून या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची गरज आहे. पावसामुळे पाण्याची पातळी वाढणं हा नित्यक्रम बनला आहे. केवळ नैसर्गिक आपत्ती असं म्हणून लोकांना दरवर्षी या परिस्थितीला सामोरं जावं लागणं हे कितपत योग्य, असा सवालही उपस्थित होतोय. सरकारी अधिकारी याबाबत नेमका काय विचार करतात आणि त्यांच्याकडून उपाययोजनांचे प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आलेत का, असाही सवाल उपस्थित केला जाऊ शकतो.

हेही वाचाः राज्यातील रस्त्यांची स्थिती चिंताजनक; प्रवाशांची केवळ गैरसोयच

धरणाचं पाणी सोडणार याची कल्पना का नाही दिली?

तिळारी म्हणा किंवा अंजुणे धरणाचं पाणी सोडण्याची वेळ येते त्यावेळी संभावित पीडित भागांतील लोकांना याची कल्पना देण्याची गरज असते. जलस्त्रोत खात्याचे अधिकारी ही माहिती तालुका मामलेदार, उपजिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवतात. या अधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायत आणि नगरपालिकांना याची माहिती देणं क्रमप्राप्त असतं. ग्रामपंचायत आणि नगरपालिकांनी ही माहिती पूराचा फटका बसण्याची शक्यता असलेल्या भागातील लोकांना देऊन त्यांना सतर्क ठेवण्याची गरज असते. ही यंत्रणा अजिबात राबवण्यात येत नाही. लोकांना कोणतीही कल्पना दिली जात नाही. या परिस्थितीला नेमका जबाबदार कोण, याचं उत्तर सरकारने शोधण्याची गरज आहे.

हेही वाचाः आभाळ फाटलं…धरणीही दुभंगली ; दरडी कोसळून कोकणात 66 जणांचा बळी

‘या’ भागांना ‘हे’ अधिकारी भेट देतील

 क्षेत्र / गावभेट देणारे अधिकारी
फोंडा  
एसडीओ प्रदिप नाईकखांडेपार आणि जवळील क्षेत्रकुणाल
मामलेदार राजेशगांजे आणि लगतची क्षेत्रेहेमंत कुमार
एसी ।।। अजितउसगाव आणि जवळील क्षेत्रेपुनीत गोयल
मामलेदार साईशवाघुर्मे, सावईवेरे, वळवई आणि लगतची क्षेत्रेतारिक थॉमस
   
धारबांदोडा  
केदार नाईकधायकोंड आणि दाभाळ गाव धरून जवळील क्षेत्रेपुनीत गोयल
मामलेदार कौशिक देसाईसाकोर्डा आणि लगतची क्षेत्रे ” “
   
सासष्टी  
एसडीओ ज्योती कुमारी एसडीओ ज्योती कुमारी नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी या भागाला भेट देतील
   
काणकोण  
मामलेदार विमोद दलालखोतीगाव आणि लगतची क्षेत्रेकेशव कुमार, सीसीएफ
   
केपे  
एसडीओ निलेश धायघोडकर अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरेंद्र नाईक या भागाला भेट देतील
   
वास्को  
एसडीओ दत्तराज एसडीओ दत्तराज नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी या भागाला भेट देतील
   
सांगे  
एसडीओ सागर गावडे कुलदीप गंगर
   
पेडणे  
एसडीओ रविशंकर निपाणीकरचांदेलअशोक कुमार
मामलेदार अनंत मळीकशीरगळ धारगळ गाव“”
   
बार्देश  
मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकरकामुर्ली, नादोरा आणि लगतची क्षेत्रेपीएस रेड्डी
मामलेदार राजाराम परब“     ”“     ”
   
तिसवाडी  
राहुल देसाई, मामलेदार श्वेतिका सचन
   
डिचोली  
मामलेदार प्रविणजय पंडितचावडी सुर्ला साखळीभामई पाळेसाळसंजय कुमार
एसडीओ दीपक वायंगणकर  
   
सत्तरी  
एसडीओ राजेश आजगावकरअडवई भटवाडी, सावर्शे, मासोर्डे, वाळपई नगरपालिका क्षेत्र, आणि लगतची क्षेत्रेसंजय गृहर
 पाडेली आणि लगती क्षेत्रेसीआर गर्ग
मामलेदार दशरथ गावसमासोर्डे आणि लगतची क्षेत्रेविवेक एच पी
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!