राज्यव्यापी कर्फ्यू वाढीचा अधिकृत आदेश जारी

28 जूनपर्यंत राज्यव्यापी कर्फ्यू वाढवला; मासळी बाजार सुरू करण्यास दिली मुभा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यव्यापी कर्फ्यूमध्ये आणखी ७ दिवस वाढ केल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी केली. सोशल मीडियामध्ये पोस्ट करत त्यांनी यासंदर्भातली माहिती दिली. रविवारी कर्फ्यूमध्ये वाढ केली असल्याचं अधिकृत परित्रपक जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आलंय. दरम्यान, यावेळी देण्यात आलेल्या कर्फ्यूमधील वाढीसोबत काही प्रमाणात दिलासाही देण्यात आला आहे. यावेळी कर्फ्यूमध्ये वाढ करत असताना मासळी बाजारालाही सुरू करण्यास मुभा देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

हेही वाचाः पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पहाटे देशाला संबोधित करणार

मासळी बाजारही सुरु करण्यास मुभा

२८ जून सकाळी ७ वाजेपर्यंत कर्फ्यूत वाढ करण्यात येत आहे. दरम्यान, शॉपिंग मॉलमधील दुकानांना सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी‌ असेल. मात्र सिनेमा हॉल, थिएटर, मल्टीप्लेक्स, एन्टरटेमेंट झोन बंदच राहणार आहेत. विशेष म्हणजे मासळी बाजारही सुरु करण्यास मुभा देण्यात आली आहे. सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मासळी बाजार खुले ठेवण्यात येणार आहेत.

लसीकरणाचा वेग वाढला

राज्यातील रुग्ण हळूहळू आटोक्यात येत आहे. मात्र मृत्यू होण्याचं प्रमाण अजूनही म्हणावं तसं कमी झालेलं नाही. त्यामुळे राज्यातील कोरोनाची लाट जरी ओसरत असल्याचा दावा केला जात असला तरीही चिंता कायम आहे. अशातच कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला जोरात सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील १०० टक्के लसीकरणाचं लक्ष्य गाठण्यासाठी वेगानं लसीकरण मोहीम राबवली जाते आहे. अशातच जोपर्यंत १०० टक्के लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत पर्यटन सुरु करणं शक्य नसल्याचं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटलं होतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!