गोवा कोविडबाधितांमध्ये पुढे, तर लसीकरण मोहिमेत मागे

द न्यूयॉर्क टाईम्सचा अहवाल; उपलब्ध निधी आणि संसाधने प्रभावी लसीकरण मोहिमेत उपयोगात आणण्याची गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाईंची शिफारस

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः आंतरराष्ट्रीय प्रकाशन द न्यूयॉर्क टाईम्सने गोवा कोविडबाधितांमध्ये पुढे, तर लसीकरण मोहिमेत मागे असल्याचं त्यांच्या अहवालात म्हटलं आहे. यावरून गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांवर निशाणा साधत घणाघाती टीका करणारं ट्विट केलंय.

द न्यूयॉर्क टाईम्सचा अहवाल

द न्यूयॉर्क टाईम्समधील अहवालाचा संदर्भ देताना सरदेसाईंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. द न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार गोवा 100,000 लोकांमध्ये कोव्हिड-19 ची नवीन प्रकरण सापडण्यात जागतिक पातळीवर सर्वोच्च आहे तर लसीकरण मोहिमेत सर्वात मागे आहे, असं म्हटलं आहे.

हेही वाचाः DRDO सोमवारी लाँच करणार डीजी अँटी कोविड औषध

प्रसिद्ध पर्यटन स्थळ ते बनाना रिपब्लिक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांवर ट्विट करताना गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाईंनी म्हटलंय, द न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार 100,000  लोकांमध्ये गोवा हे कोविड रुग्ण सापडण्याचं सर्वोच्च जागतिक उदाहरण आहे आणि कोविड लसीकरण मोहिमेत गोव्याचा क्रमांक सर्वांत शेवटी लागतो. डॉ. प्रमोद सावंतांचं गैरव्यवस्थापन आणि अज्ञानामुळे जागतिक पातळीवर गोव्याची ओळख ही प्रसिद्ध पर्यटन स्थळापासून बनाना रिपब्लिक अशी अशी लाजिरवाणी बनली आहे!

उपलब्ध निधी आणि संसाधने उपयोगात आणण्याची आवश्यकता

ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरदेसाईंनी मुख्यमंत्र्यांना उपदेशाचे डोसही पाजले आहेत. काही सुचना करताना सरदेसाईंनी म्हटलंय, सध्याची कोविड परिस्थिती जर बदलायची असेल तर राज्याने प्रभावी लसीकरण मोहिमेत आपला उपलब्ध निधी आणि संसाधने उपयोगात आणण्याची आवश्यकता आहे. जसं की कार्यक्षम लसीकरण मोहिम जर राज्यात राबवायची असेल तर सरकारने त्यासाठी मुक्तिदिन निधीतील 300 कोटींचा उपयोग करायला हवा. गोव्यामध्ये असं करण्याची क्षमता आणि सुविधा आहेत आणि आम्ही अजूनही लसीकरण केंद्र म्हणून गोंयकार घराचे दरवाजे उघडण्यास तयार आहोत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!