नर्सेसची पुन्हा असोसिएशनकडे तक्रार

कोविड विभागात काम म्हणून होते बदनामी

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: येथील हाऊसिंग सोसायटीमधील नर्सेसच्या वास्तव्याला विरोध करण्याचं प्रकरण ताजं असतानाच सार्वजनिक कार्यक्रमात कोविड वॉर्डमध्ये काम करणाऱ्या नर्सेसना बोलावू नये, अशा आशयाचा डिचोली येथील शिक्षणतज्ज्ञ महिलेचा संदेश समाजमाध्यमावर व्हायरल होत असल्याने नर्सेसकडून पुन्हा असोसिएशनकडे तक्रार करण्यात आली आहे. असोसिएशनने या प्रकरणी शुक्रवारी डिचोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात येणार असल्याचं सांगितलं.

हेही वाचाः ऑफर आल्यास भाजपच्या तिकिटावर लढू

संदेश सोशल मीडियावर वायरल

कोविड महामारीच्या कालावधीत फ्रंटलाईन वर्कर म्हणून कार्यरत नर्सेस मार्च २०२० पासून अविरत काम करत आहेत. मडगाव येथील एका हाऊसिंग सोसायटीत वास्तव्यास असणाऱ्या नर्सेसच्या मुद्द्यावरून सोसायटीने पाठवलेल्या नोटिशीनंतर संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यानंतर हाउसिंग सोसायटीच्या अध्यक्षांनी माफीनामा देत प्रकरण मिटवलं होतं. आता डिचोली येथील शिक्षणतज्ज्ञ व्हिक्टोरिया डायनोसिओ यांनी कोविड विभागात काम करणाऱ्या नर्सेसना सार्वजनिक कार्यक्रमात निमंत्रित करू नये. कार्यक्रमात सहभागी लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा संदेश लिहिला होता. तो समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

हेही वाचाः CORONA UPDATE | गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 91,702 नवे रुग्ण

अशा व्यक्तीवर कारवाई करा

दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलमधील कॅज्युअल्टी विभागाच्या प्रमुख लिस्मा बर्रेटो यांनी ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया गोवा या नर्सेसच्या असोसिएशनकडे याबाबत तक्रार केली आहे. अशाप्रकारच्या संदेशातून नर्सेसच्या कामाचा अपमान होत असून कामाचा उत्साह कमी होऊ शकतो. संबंधित व्यक्तीने नर्सेसची माफी मागावी, अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणीही लिस्मा यांनी असोसिएशनकडे केली आहे.

हेही वाचाः मुंबईत सध्या 485 अतिधोकादायक इमारती

संबंधित महिलेविरोधात तक्रार

नर्सेसची बदनामीबाबतची तक्रार आली आहे. याची गंभीर दखल असोसिएशनने घेतली आहे. कोविड काळात रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या नर्सेसचा सन्मान केला पाहिजे. मात्र, काही जणांकडून चुकीचे प्रकार घडत आहेत. शुक्रवारी डिचोली पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरोधात तक्रार नोंदविली जाईल, असं अखिल गोवा नर्सेस असोसिएशनचे अध्यक्ष कुंतल केरकर म्हणालेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!