‘एनएसयूआय गोवा’ने सुरू केली लसीकरण नोंदणी मोहीम

मोहिमेंतर्गत गोंयकारांमध्ये कोविड लसीकरणासाठी करणार जागृती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः आपल्या प्रियजनांना वाचवण्याची लसीकरण ही एकमेव आशा आहे, म्हणून एनएसयूआय गोवाने लसीकरण नोंदणी मोहीम सुरू केली आहे आणि या मोहिमेंतर्गत संपूर्ण गोव्यात जागरूकता निर्माण केली जाणार आहे. तसंच गोंयकारांना राज्यातील विविध लसीकरण केंद्रांवर स्वत:ची नाव नोंदणी करण्यासाठी आणि लस घेण्यास मदत करण्यासाठी आम्ही मदत करणार आहोत, असं एनएसयूआय उत्तर गोवाचे अध्यक्ष नौशाद चौधरी म्हणाले. नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) गोवा युनिटने मंगळवारी 18 मे रोजी लसीकरण नोंदणी मोहीम सुरू केली आहे. यावेळी ते बोलत होते.

हेही वाचाः मंगळवारी कोरोनाचे आणखी ४५ बळी, सर्वाधिक मृत्यू जीएमसीत

एनएसयूआय उत्तर गोवाचे अध्यक्ष नौशाद चौधरी म्हणाले…

लस घेण्यास इच्छुक असलेल्यांसाठी आम्ही को-विन वेबसाइटवर स्लॉट बुक करणार आहोत. प्रत्येकाला रजिट्रेशन करणं जमतंच असं नाही म्हणून आम्ही हे पाऊल उचललं आहे. ग्रामीण भागात राहाणाऱ्यांसाठी आम्ही वाहतूकीची सोयही करणार आहोत. कारण प्रत्येकाने लस घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. यामुळे कोविडमुळे वाढलेला मृत्यूदर कमी होण्यास मदत होणार आहे. जीएमसीतील गार्डचे अध्यक्ष डॉ. प्रतीक सावंत यांनी लोकांना सामुहिक जबाबदारी घेण्याची आणि मृत्यूदर कमी करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून राज्यातील आरोग्य यंत्रणा तसंच डॉक्टरांवरील ताण कमी होण्यास मदत होईल. तसंच कोविड-१९च्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी योजना आखण्यासाठी त्यांना थोडा ब्रेक मिळू शकेल, असं चौधरी म्हणाले.

हेही वाचाः ACCIDENT | बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात; 16 प्रवासी जखमी

एनएसयूआयचे अध्यक्ष अहराज मुल्ला म्हणाले…

दोन दिवसांपूर्वी गोव्यात येऊन गेलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे संपूर्ण गोव्याचं चित्रच बदलून गेलंय. या चक्रीवादळामुळे राज्यातील मालमत्ता, इंटरनेट सेवा आणि वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ज्यामुळे अनेक लोक इंटरनेटवर लसीकरणासाठी नाव नोंदणी करण्यास तसंच लसीकरण केंद्रांपर्यंत पोहोचण्यास असमर्थ आहेत. म्हणूनच, या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही गोंयकारांची को-विन पोर्टलवर नाव नोंदणी करून त्यांच्यासाठी लसीकरण अधिक सुलभ करू इच्छितो.

हेही वाचाः वीज विभागाने केलं दिवस-रात्र काम; बुधवारपर्यंत वीज पुरवठा सुरळीत

मदत मिळवण्यासाठी आमच्याशी इथे संपर्क करा

ज्यांना त्यांच्या कोविड लसीकरणासाठी को-विन पोर्टलवर नाव नोंदणी करण्यात अडथळे येत असतील ते आमच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क करू शकतात
(उत्तर गोव्यासाठी) 9637194053 – नौशाद चौधरी, 9763699885 – मौलाली बिजघर आणि
(दक्षिण गोव्यासाठी) 8007274393 – अहराज मुल्ला, 7038466807 – रितेश वाडेकर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!