नरकासुरा रे नरकासुरा! पणजी पालिकेने यु टर्न मारला पुन्हा, अखेर ‘ते’ नियम मागे

लोकांनी नियमांवर व्यक्त केली होती नाराजी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : पणजी महापालिकेने काही दिवसांपूर्वीच नरकासूर साधेपणाने साजरा करण्याबाबत नियम जारी केले होते. हे नियम मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळालाय. राज्यात नरकासूर हा उत्साहात साजरा केला जात असतो. त्यापार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या नियमांवरुन मोठी नाराजी उमटली होती. अखेर हे नियम मागे घेण्यात आले असल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली आहे.

काय होते नियम?

नरकासुराच्या उंचीवर मर्यादा घालण्यात आले होते. नरकासुराची उंची ही ८ फुटांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा नियम करण्यात आला होता. त्यामुळे नाराजी पसरली होती. अखेर हा नियम मागे घेण्यात आला आहेत. त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे डीजे किंवा गाणी लावण्यावरही निर्बंध घालण्यात आले होते. त्यावरील निर्बंधही मागे घेण्यात आले आहेत. आता लोकांना गाणी किंवा लाऊडस्पीकर लावता येणार आहेत.

पण, काळजी घ्यायला हवीच!

लोकांच्या नाराजीनंतर नियम मागे घेण्यात आले असले तर नरकासुराची होणार राख रस्त्यावर साचून राहणार नाही, याची दक्षता प्रत्येकानं घ्यायला हवी, असं आवाहन महापौरांनी केलं आहे. त्यामुळे नरकासुराचं दहन रस्त्यावर करु नये, असंही सांगण्यात आलंय. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणंही गरजेचं असल्याचं महापौरांनी म्हटलंय. तसंच मास्कचा वापरही प्रत्येकानं करणं बंधनकारक असणार आहे.

दिवाळीला काही दिवस बाकी असतानाच महापौरांनी घेतलेल्या या निर्णयानं राजधानी पणजीतील लोकांना दिलासा मिळाला असल्याची भावना व्यक्त केली जाते आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तर नियम मागे घेण्याचा निर्णय झाला नाही ना, अशीही चर्चा रंगू लागली आहे. मात्र तूर्तासतरी दणक्यात नरकासूर साजरा होईल, एवढं नक्की. फक्त तो साजरा होताना हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता प्रत्येकानं घ्यायची आहे. बोला… नरकासुरा रे नरकासुरा!

हेही वाचा –

ईएसआय हॉस्पिटलमधील नर्सवर टांगती तलवार, तर डॉक्टर आंदोलनाच्या तयारीत

भाजपला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज, प्रफुल्ल पटेलांचे संकेत

‘बबडो नालायक असा’, वेंगुर्ल्याच्या मालवणी आजींची बबड्यावर आगपाखड

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!