3 हजार टॅक्सींना वाहतूक खात्याकडून परमिट रद्द करणारी नोटीस

१५ दिवसांत परमिट खात्याकडे जमा करण्याचे निर्देश; शापोरा, कळंगुट आणि कांदोळी भागातील टॅक्सींचा अधिक समावेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: डिजिटल मीटर बसविण्यास नकार दर्शवणाऱ्या सुमारे तीन हजार पर्यटक टॅक्सींना वाहतूक खात्याने परमिट रह करणारी नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये टॅक्सीमालकांना १५ दिवसांत परमिट खात्याकडे जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. या पर्यटन टॅक्सींमध्ये शापोरा, कळंगुट व कांदोळी या भागातील टॅक्सींचा अधिक समावेश आहे. वाहतूक खात्याकडून परमिट रद्द करणारी नोटीस बजावल्याने या सर्व टॅक्सी सध्या बंद आहेत. त्यामुळे त्यांचा व्यवसाय सध्या ठप्प पडला आहे.

हेही वाचाः लसीकरणानंतर कोरोनाचे गंभीर साईड इफेक्ट्स नाहीत!

डिजिटल मीटर बसविण्याची सक्ती सरकारले मागे घ्यावीः टॅक्सीचालक

डिजिटल मीटर बसविण्याची सक्ती सरकारले मागे घ्यावी, अशी मागणी हे टॅक्सीचालक करीत आहेत. राज्यातील पर्यटक टॅक्सी पर्यटकांकडून जादा भाडे आकारत असल्याचा आरोप करुन गोवा ट्रॅव्हल एण्ड टुरिझम असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिका सादर करून सर्व टॅक्सींना डिजिटल मीटर बसविण्याची सक्ती करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर हे मीटर बसविण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. मात्र, त्याला पर्यटक टॅक्सीमालकांचा विरोध आहे. मीटर न बसविणाया टॅक्सींचे परमिट रद्द केले जातील असा इशारा वाहतूक खात्याने दिला होता. त्यानुसार खात्याने आतापर्यंत ते या सीरिजमधील तीन हजारच्या आसपास परमिट रद्द करण्यासंदर्भातील नोटीस जारी केल्या आहेत. येत्या काही दिवसांत वाहतूक खात्याकडून आणखीही टॅक्सींना परमिट रद्द करणान्या नोटिसा बजावल्या जाणार आहेत. या संदर्भातील प्रक्रिया सध्या सुरू आहे.

डिजिटल मीटरऐवजी एप आधारित मीटर बसवावीत, अशी मागणी हे टॅक्सीमालक करीत आहेत. अन्य राज्यांमध्ये ऑल इंडिया परमिट असलेल्या टॅक्सींना डिजिटल मीटर बसविण्याची सक्ती नाही, मग ती आम्हालाच का, असा प्रश्र ते करीत आहेत.

हेहीव वाचाः 8 कोटी परत गेले, आता 30 कोटींचं काय?

डिजिटल मीटर बसविण्याची काहींची तयारी

वाहतूक खात्याने परमिट रद्द करण्याची नोटीस बजाविल्यानंतर सुमारे ४०० च्या आसपास टॅक्सीमालकांनी खात्याला पत्र पाठवून डिजिटल मीटर बसविण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी काही दिवसांची मुदत मागण्याबरोबरच तोपर्यत परमिट रद्द करू नये, अशी मागणीही टॅक्सीमालकांनी केली आहे. त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नसल्यानेच त्यांनी सहमती दर्शवली असं टॅक्सीमालकांच्या बाजूने डिजिटल मीटर विरोधात लढा देणारे बसमालक सुदीप ताम्हणकर यांनी सांगितलं.

हा व्हिडिओ पहाः Politics | Tanawde sampark yatra| तानावडेंची कार्यकर्ता संपर्क यात्रा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!