लॉकडाऊनच्या नावाखाली अत्यावश्यक सेवा बंद करू नका

मुख्यमंत्र्यांचा पंचायती तसंच नगरपालिकांना इशारा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यात वेगाने होणारा कोरोनाच्या फैलाव आणि सुरू असलेलं मृत्यूचं तांडव, यामुळे गोंयकारांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलेलं दिसतंय. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय, यावर राज्य सरकार ठाम असल्याने या वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी आता हळुहळू पंचायती आणि नगरपालिका पुढे येऊन निर्णय घेऊ लागल्यात. पण मुख्यमंत्र्यांनी यावर हरकत घेतली आहे.

हेही वाचाः LOCKDOWN | डिचोलीत 5 दिवस पूर्ण लॉकडाऊन

राज्यातील अनावश्यक सेवा बंद करण्याचा निर्णय

आपल्या आधीच्या आदेशात बदल करताना गोवा सरकारने मंगळवारी कोविड-19 च्या फैलावावर नियंत्रण आणण्यासाठी राज्यातील अत्यावश्यक सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. गोवा सरकारने गुरुवारी संध्याकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत राज्यात लॉकडाऊन लागू केला होता. त्यानंतर अजून एका आठवडा भरासाठी मुख्यमंत्र्यांनी कोविडचे कडक निर्बंध जाहीर केले होते. मात्र त्यात बदल करत आता राज्यातील अनावश्यक सेवा बंद करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. लोकांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने रेस्टॉरंटसह अत्यावश्यक सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचाः वेर्ला-काणकानंतर इतरही ग्रामपंचायतींचा कॉन्फिडन्स वाढला! कुठ्ठाळीतही निर्णय झाला

पंचायती-नगरपालिकांकडून लॉकडाऊन

मात्र सरकारने लॉकडाऊन करण्यास नकार दिल्यानंतर अनेक पंचायती आणि नगरपालिकांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रात लॉकडाऊन जाहीर केलं आहे. कोरोनाचं प्रस्थ हळुहळू आता ग्रामीण भागात पोहोचू लागल्याने गोंयकारांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण होत असल्याचं दिसून येतंय. पण मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी पंचायती तसंच नगरपालिकांना लॉकडाऊनच्या नावाखाली अत्यावश्यक सेवा बंद न पाडण्याचा इशारा दिला.

हेही वाचाः Breaking | ‘या’ ग्रामपंचायतीनं घेतला ८ दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय

लॉकडाऊनच्या नावाखाली अत्यावश्यक सेवा बंद करू नका

जर तुम्ही अत्यावश्यक सेवा बंद केल्यात, तर लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होईल. कोणत्याच पंचायतीने किंवा नगरपालिकेने अत्यावश्यक सेवा देणारी दुकानं बंद करू नयेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. काही पंचायती लोकांना त्यांच्या नोकरीवर जाण्यापासून अडवत आहेत. रुग्णालये आणि फार्मा कंपन्यांमध्ये बरेच लोक काम करतात आणि त्यांना त्यांच्या कामावर हजर राहणे आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!