धक्कादायक : लसीमुळं नष्ट नव्हे, अधिक शक्तीशाली होतोय कोरोना विषाणू !

नोबेल विजेते फ्रान्सचे साथरोगतज्ञ शास्त्रज्ञ मॉन्टैग्नियर यांचा दावा !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : ज्या रेमडेसीविरनं अवघ्या देशाचं राजकीय आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवलं ते इंजेक्शन कोरोनावर परिणामकारक नसल्याचा मोठा खुलासा नुकताच WHO नं केला. आता आणखी एक धक्कादायक बातमी पुढं येतेय. फ्रान्समधील एका नोबेल पुरस्कार विजेते प्राध्यापक ल्यूक मॉन्टैग्नियर यांनी एक धक्कादायक दावा केलाय. प्राध्यापक ल्यूक मॉन्टैग्नियर यांनी एका मुलाखतीमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींमुळेच कोरोना विषाणू अधिक धोकादायक आणि रचनात्मक दृष्ट्या शक्तीशाली होत असल्याचं म्हटलं आहे. करोना लसीकरणामुळेच अधिक घातक ठरणारे कोरोनाचे नवीन नवीन प्रकार समोर येत असल्याचा दावाही मॉन्टैग्नियर यांनी केलाय.

ती मुलाखत ठरतेय चर्चेचा विषय

मॉन्टैग्नियर यांनी मे महिन्याच्या सुरुवातील एका फ्रेंच पत्रकाराला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी साथरोग तज्ज्ञांना लसींसंदर्भातील दाव्यांबद्दल पूर्ण कल्पना असली तरी ते शांत असल्याचा दावा केलाय. या मुलाखतीचा व्हीडिओ सोशल नेटवर्किंगवर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

लसीनं प्रसार थांबत नाही..

एका प्रश्नाला उत्तर देताना मॉन्टैग्नियर यांनी, “लसींमुळे विषाणूंचा प्रसार थांबत नाही तर त्याचा उलट परिणाम होऊन विषाणू अधिक शक्तीशाली होतात. लसीकरणामुळेच कोरोनाचे नवीन विषाणू हे आधीच्या विषाणूंच्या तुलनेत अधिक नुकसान करत असल्याचं दिसत आहे,” असा दावा केलाय. मॉन्टैग्नियर हे फ्रान्समधील प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट म्हणजेच साथरोगतज्ज्ञ आहेत. त्यांना २००८ साली नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळेच त्यांनी व्यक्त केलेली शंका आणि दावा सध्या जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!