RT-PCRचाचणी न करताही गोव्यात प्रवेश मिळेल, पण…

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : गोव्यात प्रवेश करण्यासाठी आरटीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. मात्र आता हायकोर्टानं याबाबत महत्त्वाचा दिलासा दिलाय. त्यामुळे आरटी-पीसीआर चाचणी न करतानाही आता गोव्यात प्रवेश करता येऊ शकेल. पण त्यासाठी एक महत्त्वाची अट घालण्यात आली आहे.

काय आहे अट?

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये हायकोर्टानंच हा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारलाही निर्देश दिले होते. त्यानंतर आता न्यायालयानं दिलासा देत राज्यात येणाऱ्यांबाबत महत्त्वाची सुनावणी दिली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणी हायकोर्टानं राज्यात येणाऱ्यांना दिलासा दिलाया. कामनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त गोव्या येणाऱ्या परप्रांतीयांना त्याचप्रमाणे राज्याबाहेर गेलेल्या गोमंतकीयांनी जर कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतील तर त्यांनी राज्यात प्रवेश दिला जावा, असं हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाने म्हटलंय.

मुख्यमंत्र्यांनी आधीच संकेत दिले होते!

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनीही याच अनुशंगाने प्रतिक्रिया दिली होता. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतील तर आरटीपीआस चाचणी करण्याची गरज नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, आता याबाबत आता अधिक स्पष्ट शब्दांत सुनावणी देत हायकोर्टानं अंतरिम दिलासा दिलाय. हायकोर्टाने दिलेल्या या निर्देशांमुळे आता कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना राज्यात येण्याचा मार्ग मोकळा होणारे. त्यामुळे राज्यातील पर्यटनालाही चालना मिळेल, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

चेकपोस्टवर कसून तपासणी

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. त्यामुळे अनेक पर्यटकांनी गोव्यात येण्याचा बेत रद्द केला. त्यानंतर राज्यातही कडक कर्फ्यू लागू करण्यात आला होता. दरम्यान, आता हळूहळू राज्यातील कोरोना रुग्णसंख्या घटतेय. रुग्णवाढही नियंत्रणात येत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना गोव्यात प्रवेश दिला जावा, अशी मागणी करण्यात आली होती. अखेर या मागणीसंदर्भात हायकोर्टात सुनावणी झाली असून हायकोर्टानंही याबाबत दिलासा दिलाय. दरम्यान, सध्याच्या घडीला राज्याच्या एन्ट्रीपॉईन्टवर रॅपिड एन्टीजेन टेस्ट केल्या जात आहेत. नव्या डेल्टा प्लस वेरिएन्टच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच चेकपोस्टवर कसून तपासण्यात केल्या जात आहेत. सध्याच्या घडीला राज्यात १ हजार ९०० पेक्षा कमी सक्रिय रुग्णसंख्या असून राज्याचा पॉझिटिव्हिटी रेटही कमी झाला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!