विलास मेथर हत्याप्रकरण! मुख्य संशयिताला दिलासा नाही, जामीन अर्ज फेटाळला

हायकोर्टानं जामीन अर्ज फेटाळला

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : विलास मेथर हत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठात याबाबत सुनावणी झाली. या सुनावणीत मुख्य संशयित आरोपी अल्ताफ यारगट्टी याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळलाय.

तोर्डा-पर्वरी येथील विलास मेथर यांच्यावर १४ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी पेट्रोल मिश्रित द्रव टाकून त्यांना जिवंत जाळण्यात आले होते. या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी मुख्य संशयित बिल्डर अल्ताफ शब्बीर यारगट्टी आणि खय्याद शेख या दोघांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी इतर संशयितांना अटक केली. या प्रकरणी संशयित आरोपीनं सगळ्यात आधी ३ नोव्हेंबर २०२० रोजी न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. तो न्यायालयाने फेटाळून लावला होता.

Vilas methar

त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी १४ जानेवारी २०२१ रोजी सातही संशयितांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ३०२ आणि १२० ब कलमांखाली म्हापशातील प्रथमवर्ग न्यायालयात ५०९ पानी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. या आरोपपत्रात ७१ साक्षी नोंदवण्यात आल्यात. त्यानंतर संशयित यारगट्टी यांनी न्यायालयात दुसऱ्यांदा जामीन अर्ज दाखल केला होता. तो ही न्यायालयाने ९ एप्रिल रोजी फेटाळून लावला आहे. त्यानंतर संशयित यारगट्टी याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, यावेळी हायकोर्टानंही जामीन फेटाळून लावलाय.

हेही वाचा : मोठी बातमी! बलात्काराचा आरोप होता शिक्षाही झाली आणि आता निर्दोष सुटका

काय आहे विलास मेथर प्रकरण?

ऑक्टोबरच्या 15 तारखेला एक धक्कादायक घटना पर्वरीमध्ये घडली होती. पर्वरीतील सामाजिक कार्यकर्ते विलास मेथर यांच्यावर पेट्रोल मिश्रित द्रव्य टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोव्याच्या इतिहासात आतापर्यंतची दिवसाढवळ्या अशाप्रकारे हल्ला करुन जिवंत माणसाला जाळण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला होता. या हत्याप्रकरणाचे धागेदोरे सिंधुदुर्गातही आढळून आले होते.

हेही वाचा : ही टॅक्सी घेईल करोनापासून सुरक्षेची काळजी

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!