एकही जण कसाकाय पॉझिटिव्ह आढळत नाही?

पत्रादेवी चेक पोस्टवर दररोज होते असंख्य प्रवाशांची चाचणी; खासगी बस आणि वाहनांनी असंख्य प्रवासी गोव्यात दाखल

मकबूल | प्रतिनिधी

पेडणेः गोव्यात प्रवेश करणाऱ्यांना कोविड चाचणी बंधनकारक आहे खरी. पण जे चाचणी करुन येत नाही, त्यांची चेकपोस्टवर चाचणी केली जाते. असंख्य लोकं सध्या बसने किंवा खासगी वाहनांनी गोव्यात दाखल होत आहेत. पण एकही जण कोरोना पॉझिटिव्ह अद्याप आढळून न आल्यानंही आश्चर्यच व्यक्त केलं जातंय.

पत्रादेवी चेकपोस्ट असंख्य प्रवाशांची दररोज चाचणी

पत्रादेवी चेकपोस्टवरून गोव्यात प्रवेश करणाऱ्यांची कसून तपासणी केली जातेय खरी. पण ही तपासणी खरोखरच होतेय, की तपसाणीच्या नावाखाली सोपस्कार पार पाडले जात आहेत, असा सवाल काहींनी उपस्थित केलाय. बसने किंवा खासगी वाहनांमधून मोठ्या संख्येनं गोव्यात लोक दाखल होत आहेत. पत्रादेवी चेकपोस्टवर तपासणीसाठी लागलेल्या रांगा, हेच अधोरेखित करत आहेत. पण या सगळ्यांची तपासणी होऊन अर्ध्या तासाच्या आत लोक गोव्याच्या दिशेने पुन्हा प्रवासाला लागत आहेत. एकूण चाचणी करुन आलेल्यांची चाचणी करण्यासाठी पत्रादेवी चेकपोस्टवर लगबग पाहायला मिळतेय.

नियमांचं खरोखरत किती गांभीर्यानं पालन केलं जातंय?

दरम्यान रोज असंख्य प्रवासी आता पुन्हा गोव्यात दाखल होऊ लागले आहेत. खासगी बसची वाहतूकही वाढल्याचं दिसून आलंय. या बसेसमधून मर्यादित प्रवाशांच्या घेऊन येणाऱ्यांची चाचणी पत्रादेवी चेकपोस्टवर होते. तपासणी केल्यानंतर या बस पुन्हा आपल्या मार्गाला लागतात. दरम्यान, मजूर असतील, प्रवासी असतील, यांचं गोव्यात येण्याचं प्रमाण लक्षणीय आहे. मात्र नियमांचं खरोखरत किती गांभीर्यानं पालन केलं जातंय, यावरुही शंका उपस्थित केली जातेय.

हा व्हिडिओ पहाः Video | CONGRESS DRAMA| बेंजामीन सिल्वांच्या काँग्रेस प्रवेशाचा राडा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!