‘आमच्‍या संयमाचा अंत पाहू नका’

पेडण्यात वीज गायब होण्याचे प्रकार वाढले, स्थानिक संतप्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : पेडणे भागात वीज गायब होण्याचे प्रकार वाढत चालल्याने लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. ‘आमच्‍या संयमाचा अंत पाहू नका’ अशा शब्दांत पेडणेवासीयांनी वीज खात्याला विनंती केलीए.
हेही वाचाःHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचलमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय…

विजेचा लपंडाव सुरू

पेडणे तालुक्यात गेल्‍या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. सकाळ, दुपारी आणि तिन्ही सांजेला ऐन कामाच्या, घाईगडबडीच्या वेळी अचानक वीज गायब होत असल्‍यामुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. वीज पुरवठा अचानक बंद झाल्यानं सर्व कामं ठप्प होतात. वीज पुरवठा बंद झाल्याने आपल्या कामांसह इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरही त्याचा परिणाम होतो.

हेही वाचाःमोपा विमानतळावर विमाने उतरवण्यासाठी सोयी सुविधा सज्ज…

दोन तास वीज नसली तरी किमान बारा तास पाणी नाही

वीजदुरुस्तीची कामे हाती घेण्याच्या नावाखाली  वीज खातं अधूनमधून हक्काने शटडाऊन करून कामं करत असतानाही कधीकधी अर्धा दिवस वीज बंद करून नागरिकांना हैराण करून सोडलं जातं. यासंदर्भात पूर्वसूचना दिली तरीही काहींना त्याची कल्पना नसते. त्यामुळे अचानक वीज गेल्यावर त्‍यांची तारांबळ उडते. पेडणे तालुक्याचा विचार केला तर चांदेल जलप्रकल्प पूर्णपणे विजेवर अवलंबून आहे. दोन तास जरी वीज नसली तरी किमान बारा तास पाणी नसतं. वीज नाही तर पाणी नाही, अशी स्थिती पेडणेवासीयांची झालीए. त्यामुळे‘आमच्‍या संयमाचा अंत पाहू नका’ अशा शब्‍दांत पेडणेवासीयांनी वीज खात्‍याला विनंती केलीए.

हेही वाचाःमुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!