विजेचा लपंडाव, काणकोणात वीज अधिकाऱ्यांना घेराव

काणकोणचे वीज अभियंते गोविंद भट यांना घेराव

Goan Varta Live | प्रतिनिधी

काणकोण : वारंवार तासभर विजेच्या प्रवाहात खंड पडत असल्याने सोमवारी काँग्रेसच्या नेत्यांनी तसेच ‘गोंयकार’ या बिगर सरकारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काणकोणचे वीज अभियंते गोविंद भट यांना घेराव घातला. येत्या पाच दिवसांत विजेच्या प्रवाहात सुधारणा न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

कुंकळी व शेल्डे येथून विजेच्या प्रवाहात बिघाड झाल्यास काणकोणमधील प्रवाहात खंड पडत असतो. काणकोणवासियांना उत्तमरीत्या विजेची सोय देण्याची आपली नेहमीच तयारी असते, असे अभियंते भट यांनी यावेळी आंदोलकांना सांगितले

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!