साखळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्याविरोधात अविश्वास ठराव

6 आणि 7 ऑगस्ट रोजी होणार चर्चा

विशांत वझे | प्रतिनिधी

डिचोली: साखळी पालिका नगराध्यक्ष राया पार्सेकर तसंच उपनगराध्यक्ष राजेश सावळ यांच्या विरोधात सहा नागसरसेवकांनी अविश्वास ठरावाची नोटीस बजावली आहे. यावर 6 आणि 7 ऑगस्ट रोजी साखळी पालिका कार्यालयात चर्चा होणार आहे.

हेही वाचाः वालावलकर उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 98.51 टक्के

6 आणि 7 ऑगस्ट रोजी होणार चर्चा

भाजप नगरसेवक आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, शुभदा सावईकर, रश्मी देसाई, ब्रम्हा देसाई, यशवंत माडकर यांनी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. नगराध्यक्ष राया पार्सेकर यांच्यावरील ठरावावर 7 रोजी आणि उपनगराध्यक्ष राजेश सावळ यांच्यावरील ठरावावर 6 रोजी दुपारी तीन वाजता चर्चा होणार आहे. त्यामुळे पुन्हा पालिकेचे सत्ता नाट्य रंगणार आहे.

हेही वाचाः ACCIDENT | धारगळ जंक्शनवर ट्रक – दुचाकीचा अपघात

अविश्वास ठरवाकडे विशेष लक्ष

धर्मेश सागलानी यांच्या ‘टूगेदर फॉर साखळी’ गटात राया पार्सेकर, ज्योती ब्लेगंन, कुंदा माडकर, अँसिरा खान, राजेंद्र आमेशकर, राजेश सावळ हे सात नगरसेवक आहेत. भाजपने पुन्हा अविश्वास ठराव दाखल केलेला असताना आणि त्यांच्याकडे सहा नगरसेवकांचे बळ असूनही हा ठराव दाखल केला आहे. उपलब्ध माहितीनुसार सध्या सत्ताधारी गटातील दोन नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासाठी तक्रार नोंदवण्यात आलेली असून त्याची सुनावणी सुरू आहे. त्यामुळे या अविश्वास ठरवाकडे विशेष लक्ष लागून राहिलं आहे.

हेही वाचाः Tokyo Olympic 2021 : ‘चक दे इंडिया’; 41 वर्षानंतर हॉकीमध्ये पदक

भाजपला पुन्हा साखळी पालिकेवर आपली सत्ता स्थापन करण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न सुरू असून सत्ता नाट्य कोणतं वळण घेतं ते पाहावं लागेल.

हा व्हिडिओ पहाः Video | MIGRANT | परप्रांतीयांसाठी हे विधेयक आणल्याचा दावा फोल!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!