SDG 2021 । देशातील राज्यांत गोवा चौथ्या, तर केरळ पहिल्या स्थानी

नीती आयोगाचा ‘एसडीजी’ इन्डेक्स अहवाल जाहीर; बिहार शेवटच्या स्थानी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः नीती आयोगाने गुरुवार 3 जून रोजी सतत विकास लक्ष्यासाठी (एसडीजी) इंडिया इंडेक्स 2020-21 निर्देशांक जाहीर केला. एसडीजीच्या अहवालानुसार केरळने भारतातील राज्यांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे, म्हणजे ते पहिल्या क्रमांकावर आहे. तर बिहारने सर्वात वाईट कामगिरी केली आहे. एसडीजी सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय घटकांवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रगतीचं मूल्यांकन करतं. 75 गुणांसह केरळने अव्वल राज्य म्हणून आपलं स्थान कायम राखलं. हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडू दोघांनीही 74 च्या गुणांसह दुसरं स्थान पटकावलं. तर तर 72 गुणांसह गोव्याने चौथं स्थान पटकावलं आहे. यंदाच्या भारत निर्देशांकात बिहार, झारखंड आणि आसाम सर्वांत वाईट कामगिरी करणारी राज्य ठरलीत.

हेही वाचाः कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना पाच वर्षं पगार

दुर्मिळ डेटा-चालित उपक्रम

एनआयटीआय आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांच्या हस्ते गुरुवारी भारताच्या एसडीजी निर्देशांकाची तिसरी आवृत्ती लाँच करण्यात आली. कुमार म्हणाले की एसडीजी इंडिया इंडेक्स आणि डॅशबोर्डच्या माध्यमातून एसडीजींवर नजर ठेवण्याचे आमचे प्रयत्न जगभरात मोठ्या प्रमाणावर पाहिले जातायत आणि त्यांचं कौतुक होतंय. एसडीजीवर एकत्रित निर्देशांक मोजून आमची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना क्रमवारी लावण्यासाठी हा एक दुर्मिळ डेटा-चालित उपक्रम आहे. हे प्रथम डिसेंबर 2018 मध्ये लाँच केलं गेलं. देशातील एसडीजीवरील प्रगतीवर नजर ठेवण्यासाठी तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जागतिक लक्ष्यांवर स्थान मिळवून स्पर्धा वाढविण्यासाठी निर्देशांक हे मुख्य साधन बनले आहे.

एसडीजी 2020-21 वर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची कामगिरी आणि रँकिंग खालीलप्रमाणेः

निर्देशांकात अंतिम रॅंकवाल्या राज्यांत राजस्थान (60), उत्तर प्रदेश (60), आसाम (57), झारखंड (56) आणि बिहार (52) यांचा समावेश आहे.  केंद्र शासित प्रदेशांत अंदमान आणि निकोबार 5 व्या स्थानावर आहे. निर्देशांकात अंदमान आणि निकोबार बेट हे आघाडीचे राज्य/केंद्रशासित प्रदेश आहे. केंद्रशासित प्रदेशांमध्ये जम्मू-काश्मीर (66), लडाख (66) आणि दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव (62) सर्वांत खालच्या स्थानावर आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!