येत्या शैक्षणिक वर्षातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बातमी, वाचा सविस्तर…

येत्या शैक्षणिक वर्षासाठी हीच पद्धत लागू असेल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : येत्या शैक्षणिक वर्षातही (२०२२-२३) बारावीचा निकाल यंदाप्रमाणे दोन परीक्षांवर आधारित असेल. त्यानंतर पूर्वीप्रमाणे एकच अंतिम परीक्षा घेणे शक्य आहे, असे शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचाःएवढ्या रुपयांनी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार !

प्रथमच त्या दोन सत्रांत घेण्यात आल्या

मागील वर्षी कोविडचा उद्रेक होता. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा घेतल्या नव्हत्या. मुलांच्या मागील परफॉर्मर बेस निकाल दिला होता. तो ९९.४० टक्के निकाल लागला होता. यंदा नेहमीप्रमाणे नियमित परीक्षा घेण्यात आल्या. मात्र, प्रथमच त्या दोन सत्रांत घेण्यात आल्या. प्रत्येक सत्राला ५० टक्के गुण देण्यात आले. याशिवाय अंतर्गत मूल्यमापनासाठी २० टक्के गुण देण्यात आले. त्यावरून हा निकाल देण्यात आला. हीच पद्धत येत्या शैक्षणिक वर्षासाठी लागू असेल. त्यानंतर त्यात बदल करणे शक्य होईल. त्याचा निर्णय मंडळ घेईल, असे शेट्ये यांनी म्हटले आहे.
हेही वाचाः’गोवन वार्ता लाईव्ह’च्या किशोर नाईक गावकरांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर…

सांस्कृतिक गुणांविषयी निर्णय नाही

क्रीडा गुणांप्रमाणेच सांस्कृतिक गुणांचाही नववी आणि बारावीच्या परीक्षेत समावेश केला जाईल, अशी घोषणा सरकारने केली होती. पण, सरकारकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. यामुळे अंतिम निकालांमध्ये यंदा सांस्कृतिक गुणांचा समावेश करण्यात आलेला नाही.
हेही वाचाःबारावीचा निकाल जाहीर ; मुलींनी मारली बाजी…

दहावीचा निकाल येत्या आठवड्यात

येत्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. दरवर्षी प्रथम बारावीचा निकाल जाहीर होतो. त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर होतो.
हेही वाचाःअटल सेतू वाहतूकीसाठी बंद होणार?

कॉपी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांवर कारवाई

बारावीच्या परीक्षेत कॉपी करण्यासह अन्य गैरव्यवहारप्रकरणी दोन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. इतर दोन विद्यार्थ्यांना ताकीद देण्यात आली. एका विद्यार्थ्याने परीक्षेसाठी गणिताची सूत्रे लिहून ठेवली होती. या विद्यार्थ्याला शून्य गुण देण्यात आले असून १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. एका विद्याथ्याने त्याच्या मोबाईलवर प्रश्नाच्या उत्तरांचे फोटो आणले होते. त्यालाही पेपरमध्ये शून्य गुण देण्यात आले असून १ हजार रुपये दंड ठोठावला आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना बोर्डाने पत्र लिहिले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.
हेही वाचाःबनावट नोटा छापण्यात कुटुंबीयांची ‘साथ’…वाचा सविस्तर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!