नवनिर्वाचित राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लईचं गोव्यात आगमन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलं राज्यपालांचं स्वागत

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः  गोव्याचे नवनिर्वाचित राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई गोव्यात दाखल झाले आहेत. दाबोळी विमानतळावर त्यांचं आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यपालांचं स्वागत केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, मंत्री मॉविन गुदिन्हो, सभापती राजेश पाटणेकर उपस्थित होते. याविषयी ट्वटि करत मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे. १५ जुलै रोजी पिल्लई राज्याचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेणार आहेत.

15 जुलै रोजी शपथविधी

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची गेल्या 6 जुलै रोजी मिझोरममधून गोव्यात बदली झाली. लवकरच आपण गोव्याच्या राज्यपालपदाचा ताबा घेणार असल्याचे त्यांनी त्याच दिवशी सांगितलं होतं. त्यानुसार पिल्लई १५ जुलै रोजी सायंकाळी राज्यपालपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनावर आयोजित कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती त्यांना शपथ देतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.

हेही वाचाः लस घ्या; अन्यथा आठवड्याला कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र दाखवा

राजकारणी, वकील आणि लेखक

पी. एस. श्रीधरन पिल्लई हे एक भारतीय राजकारणी, वकील आणि लेखक आहेत. गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते मिझोराम राज्याचे १५ वे राज्यपाल म्हणून काम कार्यरत होते. त्यापूर्वी ते केरळ राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते.

हेही वाचाः आज, उद्या पावसाचा जोर वाढणार; 16 जुलै पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज

राजकीय कारकीर्द

पिल्लई यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय जनता पक्षाची विद्यार्थी शाखा ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’मार्फत (एबीव्हीपी) केली. महाविद्यालयीन काळात ते एबीव्हीपीचे राज्य सचिव होते. त्यांनी कोझिकोड जिल्हा अध्यक्ष, राज्य सचिव आणि सरचिटणीस यांच्यासह भाजपमध्ये अनेक पदांवर काम केलं आहे. २००३ ते २००६ या काळात केरळमध्ये भारतीय जनता पक्षाचे (भाजप) भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आणि २००४ मध्ये त्यांनी लक्षद्वीप यूटीचे भाजप प्रभरी म्हणूनही काम केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली २००४ मध्ये नॅशन डेमोक्रॅटिक अलायन्सने केरळ आणि लक्षद्वीप या दोन खासदार जागा जिंकल्या. 2018 मध्ये कुम्मानम राजशेखरन यांच्या आधी त्यांची पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. २५ ऑक्टोबर २०१९ रोजी त्यांची मिझोरामच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती.

हा व्हिडिओ पहाः Video | POLITICS | BJP | भाजपची कोणाशीही युती नाही : तानावडे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!