नव्या महिन्यापासून हायकोर्टाची नवी वेळ

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाची १ फेब्रुवारी पासून कामकाजाची वेळ बदलण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातून तसेच दूर अंतरावरून येणाऱ्या याचिकादाराना तसेच वकिलांची गैरसोय होणार असल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
काय असणार नवी वेळ?
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे १ फेब्रुवारी पासून सकाळी ९ ते दुपारी १२.०० वाजता पहिले सत्र सुरु होणार आहे. त्यानंतर दुपारी १२.०० ते १२.३० दरम्यान सुटी असणार आहे. त्यांनंतर दुसरे सत्र दुपारी १२.३० ते २.३० पर्यत कामकाज सुरु राहणार आहे. या बाबत हाय कोर्ट बार असोसिएशनने १४ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या बैठकीत वरील कामकाजाच्या वेळेची सूचना केली होती. या सुचनेला मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीनी परवानगी दिली. त्यानुसार १ फेंबुवारी पासून नवीन वेळेनुसार गोवा खंडपीठाचे कामकाज सुरु होणार आहे. याबाबतची नोटीस खंडपीठाचे निबंधक (न्यायिक) किरण ए. बागी यांनी जारी केली आहे.

गैरसोय होणार
या नवीन बदल्यामुळे पेडणे, वाळपई, सांगे तसेच काणकोण भागातून येणाऱ्या याचिकादार तसेच इतरांना गैरसोय होणार आहे. तसेच काही ग्रामीण भागातून आणि सार्वजनिक बस सेवा वापरणाऱ्या संबधितांना गैरसोय होणार असल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
हेही वाचा –
सत्तरीनंतर आता पेडणेतही भूमिपुत्रांचा उठाव
हृदयद्रावक! नास्नोळ्यात रोड रोलरखाली येउन चालकाचा मृत्यू
फायनली FAU-G लॉंच, अक्षय कुमारने शेअर केला व्हिडीओ
मोठी बातमी! शशी थरुरांसह 6 पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा