अंबादास जोशींनी घेतली राज्याच्या लोकायुक्तपदाची शपथ

दोनापावला येथील राजभवनात पार पडला शपथविधी; राज्यपालांनी दिली जोशींना लोकायुक्त पदाची शपथ

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजी: मुंबई उच्च न्यायालयाचे माजी निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांची गोवा लोकायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. शुक्रवारी त्यांनी लोकायुक्तपदाची शपथ घेतली.

राजभवनात पार पडला शपथविधीचा कार्यक्रम

गोव्याचे नवनिर्वाचित लोकायुक्त अंबादास जोशींनी शुक्रवारी लोकायुक्त कार्यालयाचा ताबा घेण्यापूर्वी सकाळी 11 वा. राज्यपालांकडून त्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत त्यांना शपथ दिली. हा कार्यक्रम दोनापावला येथील राजभवनात संपन्न झाला.

राज्यपालांकडून जोशींच्या नावाला मंजुरी

राज्याचे माजी लोकायुक्त एम. के. मिश्रा हे 2019 मध्ये सप्टेंबर महिन्यात निवृत्त झाले होते. गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गोव्याच्या लोकायुक्त पदी अंबादास जोशी यांच्या नावाला 5 एप्रिलला मंजुरी दिली होती.

कोण आहेत अंबादास जोशी?

  • शिक्षण बीएससी, एलएलबी (मुंबई)
  • 1979 पासून ठाणे येथे वकिली
  • 1993 मध्ये सरकारी वकील म्हणून नेमणूक
  • 20 ऑगस्ट 1993 मध्ये सत्र न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती
  • 1996 ते 2000 या कालावधीत अमली पदार्थ न्यायालयाचे विशेष न्यायाधीश
  • 2000 ते 2005 या कालावधीत केंद्रीय गुप्तचर विभागाच्या न्यायालयाचे विशेष न्यायाधीश
  • 2005 ते 2006 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे निबंधक
  • 2007 ते 2009 या कालावधीत रत्नागिरी येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश
  • 2009 ते 2015 या कालावधीत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!