आयपीएस अधिकारी निधीन वलसन गोवा पोलिस सेवेत रुजू

आजपासून गोवा पोलिस सेवेत दाखल

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

ब्युरो : भारतीय पोलिस सेवेच्या (आयपीएस) अँग्मू केडरच्या 2012 बॅचचे अधिकारी निधीन वलसन गोवा पोलिस सेवेत दाखल झालेत. आजपासून (सोमवार, 23 नोव्हेंबर) ते गोवा पोलिस सेवेत रुजू होणार आहे.

29 सप्टेंबरला त्यांची बदली गोव्यात करण्यात आली होती. याबाबतचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केले होते. केंद्रीय गृह मंत्रालयाचे अव्वल सचिव राकेश कुमार सिंग यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे अखेर निधीन वलसन हे गोव्यात दाखल झाले आहे.

पोलिस अधिकारी वलसन यांच्या राज्यात बदली होण्याअगोदर त्यांनी लक्षद्वीपचे पोलिस अधिक्षक म्हणून सेवा बजावली आहे. आता ते गोवा पोलिसात दाखल झालेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!