कदंब मंडळात नवीन इलेक्ट्रिक बसेस ईव्हीएस सिस्टिमशी जोडल्या जाणार

आता 'अ‍ॅप' सांगणार बसस्थानकावर बस कधी पोचणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: कदंब मंडळात आपल्या नवीन इलेक्ट्रिक बस ईव्हीएस सिस्टिमशी जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना बस नेमकी कुठे पोहचली आहे किंवा कोणत्या बसस्थानकावर बस कधी पोहचणार आहे, याची माहिती ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून मोबाईलवर मिळणार आहे.

‘अ‍ॅप’मुळे बस कुठे पोहोचली हे कळणार

या ‘अ‍ॅप’मुळे बस कुठे पोहोचली आहे तसंच जवळचं बसस्थानक शोधण्यास आणि प्रवाशाच्या वर्तमान स्थानापासून बसचं अंतर किती आहे हे तपासतादेखील येणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर हे ‘अ‍ॅप’ उपलब्ध करण्यात येईल.

हे ‘अ‍ॅप’ही प्रवाशांसाठी सहज उपलब्ध होईल

केंद्र सरकारच्या वाहन पोर्टलवर एक ‘अ‍ॅप’ जोडण्यात आलं आहे. अगदी इलेक्ट्रिक बसेसही त्या पोर्टलवर आहेत. आम्ही अटलांटा, दिल्ली आणि आय ट्रायंगल, बेंगळुरुसारखे इतर प्लेटफॉर्म मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. वाहन ‘अ‍ॅप’ प्रमाणे हे ‘अ‍ॅप’ही प्रवाशांसाठी सहज उपलब्ध होईल, असे कदंब वाहतूक महामंडळाचे महाव्यवस्थापक संजय घाटे यांनी सांगितलं.

प्रवाशांना बसचा मार्ग आणि स्थान उपलब्ध करून देऊन सार्वजनिक वाहतुकीद्वारे प्रवास सुलभ करण्यासाठी ट्रॅकिंग प्रणाली सुरु केली जात आहे. ‘अ‍ॅप’च्या अद्ययावत केलेल्या आवृत्तीत प्रवाशांना अधिक माहिती मिळणार आहे.

हा व्हिडिओ पहाः Goa Entry Point | Patradevi Checkpost | तपासणीसाठी पत्रादेवी चेकपोस्टवर गर्दी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!