यूकेहून राज्यात आलेल्या बाधितांच्या संख्येत वाढ

आतापर्यंत 15हून जास्त जणांना लागण झाल्यानं खळबळ

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : यूकेतील नव्या कोरोना स्ट्रेनमुळे राज्यातील जनतेचीही झोड उडवली आहे. यूकेहून आलेल्या शेवटच्या विमानांमधील प्रवाशांची आरपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्यांची संख्या वाढतच चालल्यानं चिंता व्यक्त केली जातेय.

नव्या कोरोना स्ट्रेनची धास्ती सगळ्यांनी घेतली आहे. अशातच राज्यात यूकेहून आलेल्या सगळ्यांचीच कोरोना चाचणी केली जाते आहे. त्यात पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. यूकेहून आलेल्या एकूण पॉझिटिव्ह असणाऱ्यांच्या संख्या राज्यात आता पंधराच्या पार गेली आहे. एकूण 16 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. या सर्वांच्या स्वॅबचे नमुने पुण्याला पाठवण्यात येणार आहे. पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीमध्ये हे नमुने अभ्यासले जाणार आहे.

शनिवारी राज्यात कोरोनामुळे आणखी तीन रुग्ण दगावलेत. त्यामुळे राज्यातील एकूण मृतांचा आकडा 731वर पोहोचलाय. तर नव्या 61 रुग्णांची भर पडली असून राज्यात सध्या 951 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्याचा रिकवरी रेट 96.67 टक्के इतका असला, तरी यूकेहून आलेल्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान होत असल्यानं चिंता व्यक्त केली जातेय.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!