पर्यटनवाढीसाठी नव्या संकल्पना पुढे आणण्याची गरज…

विजय सरदेसाई : मड वॉरिअर्स संघटनेतर्फे आगळी फातोर्डा येथे ऑफ रोड रॅलीचे आयोजन

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : पर्यटनवाढीसाठी आवश्यक त्या सुविधा देण्याची, तसेच नवनवीन संकल्पना रुजवण्याची गरज आहे. विधानसभेतही राज्य सरकारकडे लोकांना आवडतील असे उपक्रम आणण्याची मागणी केली आहे, असे प्रतिपादन आमदार विजय सरदेसाई यांनी केले. फातोर्डा आगळी परिसरात रविवारी ऑफ रोड रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.
हेही वाचा:निवडणूक प्रचारात आमदारांचाही सहभाग…

ऑफ रोड स्पर्धा हा कॅलेंडर इव्हेंट व्हावा, अशी मागणी

मड वॉरिअर्स या संघटनेतर्फे आगळी फातोर्डा येथे ही रॅली आयोजिन करण्यात आली होती. या रॅलीला मोठा प्रतिसाद लाभला. या रोड रॅलीचा शुभारंभ आमदार सरदेसाई यांच्या हस्ते झाला. यावेळी नगरसेवक कामिल बर्रेटो, घनःश्याम शिरोडकर, सदानंद नाईक आदी उपस्थित होते. आमदार सरदेसाई पुढे म्हणाले की, मड वॉरिअर्सकडून करण्यात आलेले ऑफ रोड रॅलीचे आयोजन खेळाडूंना प्रोत्साहन देणारे आहे. अशाप्रकारच्या खेळांच्या स्पर्धा होण्याची गरज आहे, तरच नवनवीन खेळांना प्रोत्साहन मिळेल. पर्यटनासाठी दरवर्षी ऑफ रोड स्पर्धा हा कॅलेंडर इव्हेंट व्हावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे. भविष्यात या रॅलीला आणखी चांगला प्रतिसाद लाभेल.
हेही वाचा:अपात्र लाभार्थ्यांकडून होणार किसान सन्मान निधीची वसुली…

स्पर्धेत सुमारे ४५ गाड्यांनी घेतला भाग

मड वॉरिअर्सचे अध्यक्ष विनीत शिरोडकर म्हणाले की, या स्पर्धेत सुमारे ४५ गाड्यांनी भाग घेतला आहे. ऑफ रोड रॅलीचे हे दुसरे वर्ष असून महिलांसाठी वेगळा गट करण्यात आला आहे. महिलांनीही या खेळात सहभाग घ्यावा या उद्देशाने महिला गटासाठी विशेष बक्षीस ठेवले आहे. आतापर्यंत आठ महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. यापुढेही अशा स्पर्धा भरवण्यात येतील, असे सांगण्यात आले.
हेही वाचा:नाक-तोंड दाबूनच समीराचा खून…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!