ड्रग्सविरोधी मोठी कारवाई! मुंबई NCBचे गोव्यामध्ये छापे

ड्रग्जचा मोठा साठा जप्त; अनेकांना अटक

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गोव्यातील सहकाऱ्यांच्या मदतीने रविवारी दिवसभर राज्यातील मिरामार आणि आसगाव या दोन ठिकाणी छापा टाकून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले. या कारवाईत विदेशी नागरिकांसह स्थानिकांनाही अटक केल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. याबाबत एनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांना विचारले असता, त्यांनी याला दुजोरा दिला.

हेही पाहा – अंमली पदार्थांच्या लागवडीबाबत मुख्यमंत्र्यांचं महत्त्वाचं विधान

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई एनसीबी एका अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील संशयितांच्या मागावर होती. हा संशयित गोव्यात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्यानुसार एनसीबीने रविवारी मिरामार परिसरात तर आसगाव-हणजुणे येथील ठिकाणी छापा टाकला. यावेळी एनसीबीने दोन्ही ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले.

या कारवाईत आसगाव येथून दोघांना तर मिरामार येथून अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात एनसीबीला हवा असलेला संशयितही सापडला. काही विदेशी नागरिकांनाही ताब्यात घेण्यात आले. या सर्व संशयितांविरुद्ध अमली पदार्थ कायदा-१९८५ च्या कलमांअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

हेही पाहा – EXCLUSIVE | गोव्यातील ड्रग्स धाडींवर एएनसी एस्पी महेश गांवकर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!